शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
4
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
5
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
6
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
7
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
9
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
10
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
11
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
12
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
13
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
14
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
15
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
16
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
17
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
18
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
19
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
20
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: भरधाव टँकरने तिघांना उडविले; एक जण जागीच ठार, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 14:24 IST

ग्रामस्थांनी टँकरचा पाठलाग करत चालकास पकडून जत पोलिसांच्या ताब्यात दिले

जत : विजापूर - गुहागर मार्गावरील जत तालुक्यातील धावडवाडी बसस्थानक येथे भरधाव टँकरच्या धडकेत एकजण ठार तर दोघे जखमी झाले. टँकरने रस्त्याच्या कडेला उभारलेल्या एकास उडवून पुढे दुचाकीस्वारास धडक दिली. यात अहमदअली बाबासो शेख (वय ५६, रा. धावडवाडी, सध्या रा. मुंबई) जागीच ठार झाले. तर मोटरसायकल वरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना आज, मंगळवारी सकाळी घडली. मृत अहमदअली शेख हा मुंबई येथे बेस्ट बसमध्ये नोकरीस होता. बकरी ईद सणामुळे तो गावी आला होता. आज सकाळी धावडवाडी येथे लागून असलेल्या बस स्टॉप लगत ते उभे होते. नागज कडून येणाऱ्या भरधाव रिकाम्या दुधाच्या टँकरने त्यांना उडविले. यात अहमदअली जागीच ठार झाले.तरपुढे दोन मोटरसायकलस्वारासह दिलेल्या धडकेत दुर्योधन तानाजी कोळेकर (२१), किरण मनोहर सुर्यवंशी (२२ दोघे रा. धावडवाडी, ता. जत) हे जखमी झाले. मयत अहमदअली याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. गावातील लोकांनी टँकरचा पाठलाग करत चालकास वायफळ येथे पकडले आणि जत पोलिसांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू