किरकोळ वादातून एकाचा खून, सांगलीतील गिरगावमधील घटना
By श्रीनिवास नागे | Updated: January 28, 2023 17:05 IST2023-01-28T16:46:38+5:302023-01-28T17:05:45+5:30
खूनाच्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली

किरकोळ वादातून एकाचा खून, सांगलीतील गिरगावमधील घटना
संख: जत तालुक्यातील गिरगांव येथे किरकोळ वादावादीतून एकाचा खून करण्यात आला. मल्लय्या हिरेमठ (वय ४०, रा. विजयपूर) असे मृताचे नाव आहे. काल, शुक्रवारी (दि.२७) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. खूनाच्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.
गिरगाव येथे दलित वस्तीत पाण्याचे टाकीचे काम चालू आहे. या कामासाठी विजापूर येथून दोन कामगारांना एका ठेकेदाराचा मार्फत आणण्यात आले होते. मयत मल्लय्या हिरेमठ व आरोपी दत्तू बजंत्री गिरगाव येथे आले असता त्यांच्यात किरकोळ वादावादी झाली. यानंतर मल्लय्या याचा मृतदेहच आढळून आला.
या खूनानंतर संशयित आरोपी दत्तू बजंत्री फरार झाल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास उमदी पोलीस करीत आहे. संशयित आरोपी दत्तू बजंत्री यांच्यावर विजयपूर जिल्ह्यात किरकोळ मारामारी, चोरी, धमकवणे असे अनेक गुन्हे आहेत.