शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत संडे नव्हे, लॉकडाऊनचा थंड डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST

सांगली : वीकेंड लॉकडाऊनला रविवारी दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. रविवारी सुटीच्या दिवशी नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या बाजारपेठांमध्ये ...

सांगली : वीकेंड लॉकडाऊनला रविवारी दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. रविवारी सुटीच्या दिवशी नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला होता. जिल्ह्यातील सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे नागरिकांनी यावेळी संडे नव्हे, थंड डे अनुभवला.

शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू झालेला लॉकडाऊन रविवारी शेवटच्या दिवशीही नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चर्चेत राहिला. नागरिक, व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करीत शासनाच्या, जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद दिला. रविवारी सांगलीच्या बाजारपेठांमध्ये सुटी असल्याने नेहमी गर्दी होत असते. बाजारपेठा, रस्ते, चौक, क्रीडांगणे, उद्याने, हॉटेल्स ही ठिकाणे गर्दीने फुलून गेलेली असतात. कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी शासनाने वीकेंड लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर नागरिकांनी स्वत:वर निर्बंध लादत घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे शहरापासून जिल्ह्याच्या वाड्यावस्त्यांपर्यंत सर्वत्र शांतता दिसून आली.

शनिवारप्रमाणेच रविवारीही रस्ते ओस पडले होते. उपनगरांमधील छोट्या रस्त्यांवरही गर्दी दिसून आली नाही. पेट्रोलपंप, एटीएम, दवाखाने, मेडिकल्स, वैद्यकीय सुविधा वगळता सर्व व्यावसाय बंद होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद राहिल्याने रस्ते निर्मनुष्य दिसत होते.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला हाेता. नागरिकांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने पोलिसांना फार काही करावे लागले नाही. तरीही काही ठिकाणी बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी विचारणा केली.

चौकट

मार्केट यार्डमधील उलाढाल ठप्प

सांगलीच्या मार्केट यार्डमधील कृषी मालांची उलाढाल गेल्या दोन दिवसांपासून ठप्प आहे. लॉकडाऊनमुळे बाजारात मालही येऊ शकला नाही. येथील व्यापारी, अडते व हमालांनी लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

चौकट

एसटीचे मोठे नुकसान

सांगली जिल्ह्यातील बसेस गेल्या दोन दिवसांपासून बंद राहिल्यामुळे जिल्ह्याच्या एसटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सोमवारपासून काही प्रमाणात फेऱ्या सुरू होण्याची चिन्हे असली तरी दोन दिवसांचे नुकसान सहन करावे लागले.

चौकट

खेळात रंगली कुटुंबे

लॉकडाऊनमुळे नागरिकांना दोन दिवस घरी बसून राहावे लागले. त्यामुळे अनेक घरांमध्ये कॅरम, बुद्धिबळ, सापसिडी असे खेळ रंगले होते. काही ठिकाणी गल्ली-बोळातील रस्त्यांवर क्रिकेटचा खेळही रंगला होता.