शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे ‘बजेट’ ७१० कोटींचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोणतीही करवाढ नसलेला महापालिकेचा ७१० कोटी ४७ लाख रुपये जमेचा व ४३ लाख रुपये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोणतीही करवाढ नसलेला महापालिकेचा ७१० कोटी ४७ लाख रुपये जमेचा व ४३ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आयुक्त नितीन कापडणीस यांनी बुधवारी स्थायी समितीकडे सादर केेला. त्यात बांधीव नैसर्गिक नाले, घनकचरा व्यवस्थापन, तलाव, चौक सुशोभीकरणावर भर देण्यात आला आहे.

महापूर व कोरोनाच्या साथीमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे, तरीही यंदा चांगले महसुली उत्पन्न मिळेल, असा आशावाद अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आला. सन २०२१-२२ या वर्षासाठी ७१० कोटी ४७ लाख रुपये महसुली जमेचा व ७१० कोटी ४ लाख रुपये खर्चाचा अर्थसंकल्प प्रशासनाने तयार केला आहे. गतवर्षीच्या अर्थसंकल्पात फारसा बदल केलेला नाही. नागरिकांवर करवाढीचा कोणताही बोजा टाकलेला नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे करवसुली झालेली नाही. त्यात थकीत घरपट्टी वसुलीसाठी दंड व शास्ती माफ करण्यात आली आहे. विविध परवाना शुल्कामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे यंदा थकबाकी वसुलीवर भर राहील. यामुळे मार्चअखेर २७२.९८ कोटीचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे, तर पुढील वर्षी महसुली उत्पन्न ३१५ कोटी ५ लाख इतके अपेक्षित आहे.

चौकट

प्रदूषमुक्त शहरासाठी २५ कोटी

महापालिका क्षेत्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी २५ कोटींची तरतूद केली आहे. प्रदूषण मंडळाच्या निर्देशानुसार त्यासाठी लेखाशीर्षही तयार केले आहे. यात प्रासंगिक पॅचवर्कच्या कामासाठी दोन कोटी, पुतळे, स्मारके, चौक दुरुस्तीसाठी २५ लाख, टेलिफोन, विद्युत वाहिनी चर दुरुस्तीसाठी १.५० कोटी, ड्रेनेज चर दुरुस्तीसाठी ७५ लाख, विभागीय पॅचवर्कसाठी ५० लाख, नवीन रस्ते, उपनगरात मुरूम, गणेश तलाव व काळी खण सुशोभीकरणासाठी प्रत्येकी एक कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन कोटी, जलनिस्सारण देखभालीसाठी एक कोटी, तर नैसर्गिक नाल्यांच्या बांधकामासाठी १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

चौकट

अर्थसंकल्पातील वैशिष्ट्ये

महापालिकेचे नवे मुख्यालय : १० कोटी

चारही प्रभाग समित्यांसाठी प्रत्येकी १ कोटी

शामरावनगर पाणी निचरा आराखडा : १ लाख

आरक्षित जागेवरील भूसंपादन : १६ कोटी

रस्ते रुंदीकरण भूसंपादन : २ कोटी

खुल्या जागांना कुंपण : २ कोटी

विस्तारित भागात भाजीमंडई : २८ लाख

शहरात नवीन नाट्यगृह : २५ लाख

अतिथिगृह पाडून नवीन व्यापारी संकुल : २ कोटी

कुपवाडसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना : १ कोटी

२०१८ ते २० मधील ठेकेदारांची बिले : २० कोटी

चौकट

महापौरांना तीन कोटींचा विकास निधी

यंदाच्या अर्थसंकल्पात प्रशासनाने महापौर निधीसाठी तीन कोटींची, तर उपमहापौर व स्थायी सभापतींसाठी दीड कोटीची तरतूद केली आहे. स्वीकृत नगरसेवकांना प्रत्येकी पाच लाख मिळतील, तर सभागृह नेते व विरोधी पक्षनेत्यांनाही ५ लाखावरच समाधान मानावे लागणार आहे.