शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण अहवालाचा महापालिकेला विसर

By admin | Updated: July 16, 2015 23:17 IST

सात वर्षांपासून बासनात : अधिकारी, पदाधिकाऱ्यांची अनास्था, ध्वनी, जल, वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढले

शीतल पाटील - सांगली -शहरातील विविध भागातील हवा, ध्वनी, जल प्रदूषणाची शास्त्रीयदृष्ट्या चाचणी करून नागरिकांना प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी वातावरण तयार करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने सर्वच महापालिकांना ३१ जुलैपूर्वी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे बंधन घातले आहे. पण गेल्या सात वर्षांपासून या अहवालाचा सांगली महापालिकेला विसर पडला आहे. यंदाही हा अहवाल तयार नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयुक्तांपासून ते वरिष्ठ अधिकारी, पदाधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांचीच पर्यावरणविषयी अनास्था दिसून येते. महापालिका क्षेत्राचा विकास साधताना पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक असते. पालिकेच्या मूलभूत व पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा, प्राणी व वनसंपदा, विरंगुळ्याची साधने, हवा, पाणी, ध्वनीप्रदूषण आदीचा अभ्यास करून पर्यावरण अहवाल तयार केला जातो. त्यातून लोकजागृती हाही एक उद्देश आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा ऊहापोह झाल्यास काही बाबींवर नियंत्रण आणता येते. पण साऱ्या गोष्टींना सांगली महापालिकेने फाटा दिला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या १५ वर्षांत अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पर्यावरण अहवाल तयार झाले. शेवटचा पर्यावरण अहवाल २००८-०९ मध्ये सादर झाला होता. तत्कालीन वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. राम हंकारे यांनी हा अहवाल तयार केला होता. त्यानंतर गेल्या सात वर्षांत पर्यावरण अहवाल तयार करण्याचाच विसर आरोग्य विभागाला झाला आहे. गत अहवालात शहरात पिण्यासाठी पुरवठा होणाऱ्या पाण्याचे गुणधर्म तपासले होते. नागरिकांना कृष्णा नदीतून पाण्याचा पुरवठा होत होता. या नदीत शेरीनाला, हरिपूर नाला, मिरज नाला अशा कित्येक नाल्यांचे पाणी मिसळत आहे. सात वर्षांपूर्वी नदीपात्रात मिसळणारे पाणी आणि आताचे पाणी यात वाढ निश्चित झाली असेल. पाण्यातील क्षारता, अल्कता, कायम जडपणा, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बोनेट, क्लोराईडस् या गोष्टींची तपासणी पर्यावरण अहवालाच्या निमित्ताने झाली असती तर, सांगलीचे पाणी किती शुद्ध आणि पिण्यायोग्य आहे, याचा उलगडा झाला असता. अनेक घटकांचा ऊहापोह पर्यावरण अहवालाच्या निमित्ताने झाला असता. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्यादृष्टीने काही उपाययोजनाही आखता आल्या असत्या. पण साऱ्या गोष्टींसाठी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे वेळच नाही, असे दिसते. काही अपरिहार्य कारणास्तव यंदा पर्यावरण अहवाल तयार झालेला नाही. गेल्या सात वर्षात अहवाल तयार होऊ शकला नाही. महापालिकेकडे पर्यावरण अभियंत्याची गरज आहे. तसा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला आहे. अहवालासंदर्भातही खासगी एजन्सी नियुक्तीचा प्रस्ताव ठेवला आहे. तो मंजूर झाल्यानंतर अहवाल तयार केला जाईल. - डॉ. सुनील आंबोळे, वैद्यकीय आरोग्याधिकारी,महापालिकासात वर्षात प्रदूषण वाढले...वाढते दळणवळण, औद्योगिकरण, वाढणारी लोकसंख्या यामुळे वायू प्रदूषणात वाढ होत राहते. गत अहवालात विश्रामबाग, मार्केट यार्ड, उत्तर शिवाजीनगर, सह्याद्रीनगर, सांगली बसस्थानक, मिरज बसस्थानक, बुरुड गल्ली, मीरा हौसिंग सोसायटी या परिसरात सर्वाधिक वायू प्रदूषण होते. सात वर्षात त्यात निश्चित वाढ झालेली असणार.शहरात त्या काळी दोन लाख ९६ हजार दुचाकी, तर तीन लाख ८२ हजार चारचाकी वाहने होती. सद्यस्थितीत वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील ध्वनी प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे.