टायर फुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली, ऐतवडे खुर्दमधील जखमी नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 19:37 IST2022-04-07T19:36:47+5:302022-04-07T19:37:09+5:30
कुरळप : वाठार (ता. कऱ्हाड) येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर टायर फुटल्याने मोटार दुभाजकावर आदळली. या अपघातात जखमी झालेल्या ऐतवडे ...

टायर फुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली, ऐतवडे खुर्दमधील जखमी नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
कुरळप : वाठार (ता. कऱ्हाड) येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर टायर फुटल्याने मोटार दुभाजकावर आदळली. या अपघातात जखमी झालेल्या ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील स्वरदा संदीप पाटील (वय ९) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना काल, बुधवारी घडली. कऱ्हाड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
ऐतवडे खुर्द येथील शिवराज विद्यालयात संदीप गणपती पाटील सहाय्यक शिक्षक आहेत. बुधवारी रात्री ते त्यांची पत्नी, मुलगी स्वरदा व दीड वर्षाच्या मुलासह मोटारीने (एमएच ०९ बीएच ३३६३) ऐतवडे खुर्द येथून कऱ्हाडकडे नातेवाइकांकडे निघाले होते.
वाठारनजीक अचानक गाडीचा पुढील टायर फुटल्याने संदीप पाटील यांचा मोटारीवरील ताबा सुटला. यात मोटार रस्त्याकडेच्या दुभाजकावर आदळली. यात पुढील सीटवर बसलेल्या स्वरदाला गंभीर दुखापत झाली. मोटारीतील अन्य तिघे किरकोळ जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने कराडच्या कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल केले. परंतु उपचारादरम्यान स्वरदाचा मृत्यू झाला.