शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नेट बॅँकिं ग फसवणुकीतील सात लाख रुपये वाचले

By admin | Updated: September 18, 2014 23:29 IST

पोलिसांची दक्षता : पथक मुंबईला रवाना

सांगली : नेट बँकिंगद्वारे पासवर्ड मिळवून व मोबाईल हॅँग करून माधवनगर (ता. मिरज) येथील शुक्रवार पेठेतील महिला व्यापारी सुश्मिता खाटक यांच्या बँक खात्यातून ११ लाख १५ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने गतीने तपास राबविल्याने चोरट्यांच्या ताब्यात गेलेली सहा लाख ७३ हजारांची रक्कम वाचविण्यात यश आले आहे. चोरट्यांनी केवळ चार लाख रुपये काढले आहेत. उर्वरित रक्कम ते काढण्यापूर्वीच पोलिसांनी बँकेस पत्र देऊन ही रक्कम काढून देऊ नये, अशी सूचना केली.सुश्मिता खाटक यांचे युनियन बँकेच्या माधवनगर शाखेत खाते आहे. त्यांच्या खात्यावरून ११ लाख १५ हजारांची रोकड चोरट्यांनी परस्पर काढली होती; मात्र त्यांचा मोबाईल हँग करण्यात आल्याने त्यांना रक्कम काढल्याचा बँकेतून मोबाईलवर मेसेज आला नाही. यामुळे त्यांनाही हा प्रकार समजला नाही. मोबाईल सुरू झाल्यानंतर बँकेतून रक्कम काढल्याचा मेसेज आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला होता. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. सावंत यांच्या आदेशावरून विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र हा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांच्याकडे सोपविला होता. डोंगरे यांनी खाटक यांच्या बँक खात्यावरून रक्कम कोणाच्या नावावर व कोणत्या बँकेत हस्तांतर झाली? याचा शोध घेतला. त्यावेळी ही रक्कम आयसीआयसीआय बँकेत रवी नारायण या संशयिताच्या नावावर हस्तांतर झाल्याचे निष्पन्न झाले. संशयिताने मुंबईतील खारघर येथील एका एटीएममधून चार लाख रुपये काढले होते. उर्वरित रक्कम तो काढण्यापूर्वीच डोंगरे यांनी आयसीआयसीआय बँकेस पत्र देऊन ही रक्कम आता काढू देऊ नये, असे पत्र दिले आहे. (प्रतिनिधी)संशयिताचा शोधरवी नारायणसह अन्य दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी डोंगरे यांचे पथक गुरुवारी सायंकाळी मुंबईला रवाना झाले आहे. त्यांनी रोकड स्वत:च्या नावावर कशी हस्तांतर केली, हे अद्याप निष्पन्न झाले नाही. संशयित सापडल्यानंतरच याचा उलगडा होईल, असे डोंगरे यांनी सांगितले.