शाळेतच मुलांना क्रीडा कौशल्याचे धडे देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:34+5:302021-02-05T07:31:34+5:30

सांगली : मैदानी खेळात विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त करण्यासाठी, मुलांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी प्राथमिक शाळेतच मुलांना क्रीडा कौशल्य आत्मसात ...

The need to teach sports skills to children in school | शाळेतच मुलांना क्रीडा कौशल्याचे धडे देण्याची गरज

शाळेतच मुलांना क्रीडा कौशल्याचे धडे देण्याची गरज

सांगली : मैदानी खेळात विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त करण्यासाठी, मुलांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी प्राथमिक शाळेतच मुलांना क्रीडा कौशल्य आत्मसात होणे गरजेचे आहे, असे मत ऑलिम्पियन अँड कॉमनवेल्थ मेडलिस्ट अपर्णा पोपट यांनी व्यक्त केले.

सांगली येथील शांतिनिकेतन येथे जिल्हा परिषद व माणदेशी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठी दि. १ ते ५ फेब्रुवारीअखेर जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. यावेळी अपर्णा पोपट बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शिक्षण सभापती आशाताई पाटील, बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, महिला व बालकल्याण सभापती सुनीता पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी राहुल गावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, माजी उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, माणदेशी चॅम्पियन प्रभात सिन्हा, आदी उपस्थित होते.

जितेंद्र डुडी म्हणाले की, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४१ शाळा भौतिक सुविधांनी सुसज्ज केल्या जाणार आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच कौशल्यपूर्ण विविध खेळाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे, या हेतूने शिक्षकांसाठी हे क्रीडा प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे.

यावेळी मानदेशी फाउंडेशनचे तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीराम बाबर, सविता देशमुख, ओंकार गोंजारी, कुशल भागवत, सारंग नवाळे, समर्थ गुजरे, मयूर लोखंडे, दीपाली शेळके, सचिन मेनकुदळे, आदी शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. या पाचदिवसीय प्रशिक्षणात सर्व प्रकारच्या खेळांचे प्रात्यक्षिकांसह नियम आणि कौशल्य शिक्षकांना शिकविले जाणार आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी राहुल गावडे यांनी प्रास्ताविक केले. विस्ताराधिकारी रंगराव आठवले यांनी आभार मानले.

Web Title: The need to teach sports skills to children in school