शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: स्वतंत्र लढतीद्वारे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दबावतंत्राची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 18:15 IST

उमेदवार नसलेल्या प्रभागांचे काय?

संतोष भिसेसांगली : महापालिकेच्या ७८ पैकी फक्त ३३ जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे सत्तेच्या निर्णयात किंगमेकर होण्याचे मनसुबे असल्याचे स्पष्ट होत आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी यांपैकी कोणाच्याही सोबत हातमिळवणी न करता स्वतंत्र लढती द्यायच्या, निकालानंतर सत्तेसाठी निर्णायक प्रसंगी पाठिंबा द्यायचा आणि त्याच्या मोबदल्यात मोक्याची पदे मिळवायची, हे राजकीय गणित असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात आहे.राज्यात महायुतीमधील घटकपक्ष असणाऱ्या अजित पवार गटाने सांगलीत महापालिकेच्या निवडणुकीची वाटचाल सुरुवातीपासूनच ‘एकला चलो रे’ अशी ठेवली आहे. किंबहुना, राष्ट्रवादीचे नैसर्गिक सहकारी पक्ष असलेला शरद पवार गट किंवा काँग्रेससोबतही पक्षाने हातमिळवणी केली नाही. ‘युती किंवा आघाडीसाठी कोणालाही प्रस्ताव दिला नव्हता,’ असे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निवडणूक जाहीर झाली, तेव्हापासूनच पक्षाने किंगमेकरची व्यूहरचना आखली असावी, असा अंदाज आहे.

वाचा : विरोधकांना ५० उमेदवारही मिळाले नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोलावास्तविक या निवडणुकीत पक्षाकडे पुरेसे उमेदवार होते. भाजपपाठोपाठ अजित पवार गटात दुसऱ्या पक्षांतून येणाऱ्यांची संख्या मोठी होती. शिवाय इनकमिंग करणारे अनेक कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या ताकदवानही होते. त्यामुळे पक्षाला सर्व म्हणजे ७८ जागा स्वबळावर लढविणे मुश्किल नव्हते. तरीही ३३ जागांपर्यंत मजल कायम ठेवत पक्षाने ‘ठंडा करके खाओ’ ही भूमिका कायम ठेवली.

युती आणि आघाडीला अप्रत्यक्ष मदतअजित पवार गटाच्या या भूमिकेमुळे उर्वरित ठिकाणी भाजप, काँग्रेस, शरद पवार गट आणि शिंदेसेनेला अप्रत्यक्ष मदत झाली आहे. पक्षाच्या सर्वच म्हणजे ३३ जागा निवडून आल्या तरी पक्ष सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे १६ जानेवारी रोजी निकालानंतर कोणाच्या पारड्यात जास्त जागा पडतात, हे पाहून पाठिंब्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पाठबळाच्या जोरावर उपमहापौर, सभापतिपदे आणि प्रसंगी महापौर ही हुकमी पदे मिळवली जाऊ शकतात. स्पष्ट बहुमत नसतानाही अजित पवार गट किंगमेकर बनू शकतो. अशा वेळी भाजपला बहुमत मिळते की काँग्रेस आघाडीला याच्याशी मतलब नसेल हे स्पष्ट आहे.उमेदवार नसलेल्या प्रभागांचे काय?अजित पवार गटाने ३३ जागा लढविण्याचे ठरविल्यानंतर उर्वरित ४५ जागा असलेल्या प्रभागांतील कार्यकर्त्यांनी काय करायचे? याचे उत्तर मात्र पक्षाकडे नाही. तब्बल सात वर्षांनी निवडणुका होत असल्याने कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली होती; पण पक्षाने तब्बल ४५ जागा रिकाम्याच सोडून दिल्याने तेथील कार्यकर्त्यांनी काय करायचे? हा प्रश्न आहे. ‘अन्य प्रभागांत जाऊन आपल्या ३३ उमेदवारांच्या प्रचाराचे काम करायचे? की तटस्थ राहून घरातच थांबायचे?’ हा प्रश्न या कार्यकर्त्यांपुढे आहे. या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे प्रा. जगदाळे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Election 2026: Ajit Pawar Group's Strategy for Kingmaker Role.

Web Summary : Ajit Pawar's NCP contests only 33 Sangli seats, aiming to be kingmaker. Supporting either coalition post-election for key positions. This strategy creates indirect support for other parties, leaving many party workers in unwon wards unsure of their next steps.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी