अंध पती-पत्नीच्या जीवनात ‘नॅब’मुळे प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:52+5:302021-02-05T07:25:52+5:30

विटा : सुळेवाडी (विटा) येथील आनंदा सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी या अंध दाम्पत्याचे जीवन सांगलीच्या ‘नॅब’मुळे प्रकाशमय झाले आहे. ...

Nab in the life of a blind couple | अंध पती-पत्नीच्या जीवनात ‘नॅब’मुळे प्रकाश

अंध पती-पत्नीच्या जीवनात ‘नॅब’मुळे प्रकाश

विटा : सुळेवाडी (विटा) येथील आनंदा सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी या अंध दाम्पत्याचे जीवन सांगलीच्या ‘नॅब’मुळे प्रकाशमय झाले आहे.

सोने-चांदी गलाई काम करणारे सूर्यवंशी दृष्टिहीन झाल्यानंतर नॅब आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी या पती-पत्नीला बेकरी व्यवसाय सुरू करून देऊन त्यांना मोठा आधार दिला आहे. त्यांच्या या सहकार्यामुळे अंध सूर्यवंशी पती-पत्नी आता बेकरी व्यवसाय सांभाळणार आहेत. सुळेवाडी येथील आनंदा सूर्यवंशी सोने-चांदी गलाई व्यवसाय करीत होते; परंतु मध्यंतरी त्यांना दिसणे कमी झाले. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी त्यांनी सांगलीच्या नॅबशी संपर्क साधून बेकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत देण्याची विनंती केली.

वैभव पाटील यांनी सूर्यवंशी यांना यशवंतनगर येथे दुकानगाळा आणि त्यात आवश्यक ते फर्निचर तसेच दोन कपाटे देऊन सहकार्य केले. नॅबच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी त्यांना विक्री माल खरेदी करून दिला. त्यामुळे या अंध पती-पत्नीने नव्याने व्यवसाय सुरू केला.

यावेळी नॅबचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र पाठक, कार्यकारी सचिव सतीश पाठारे, सचिव उदय माने, एस. के. कदम उपस्थित होते.

फोटो - ०१०२२०२१-विटा-बेकरी उद्घाटन : विटा (सुळेवाडी) येथील अंध सूर्यवंशी पती-पत्नीला बेकरी व्यवसाय सुरू करून देऊन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील व नॅबने त्यांचे जीवन प्रकाशमय केले आहे.

Web Title: Nab in the life of a blind couple