शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

माढ्यातील माय-माऊली हीच माझी ताकद--सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 23:07 IST

:लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : केवळ माढ्याची ताकद माझ्या पाठीशी असल्याने अनेक वादळांशी झुंज दिली. चळवळीतील माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला माढ्यातील माय-माऊलीनेच राजकारणातील पटलावर जन्माला घातले. माढ्यातील जनता माय-माऊली हीच माझी ताकद आणि वैभव आहे. त्यामुळे कोणीही पुढे आले तरी त्याला मी हरवू शकतो. माझ्या संघर्षाच्या काळात माढ्यातील मायमाऊली दुर्गामाता बनून माझ्या ...

ठळक मुद्दे कोणीही पुढे आले तरी, त्याला हरवणारच; इस्लामपुरात ‘रयत क्रांती’चा महिला सन्मान मेळावामाझ्या संघर्षाच्या काळात माढ्यातील मायमाऊली दुर्गामाता बनून माझ्या पाठीशी उभी राहिल्याने

:लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : केवळ माढ्याची ताकद माझ्या पाठीशी असल्याने अनेक वादळांशी झुंज दिली. चळवळीतील माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला माढ्यातील माय-माऊलीनेच राजकारणातील पटलावर जन्माला घातले. माढ्यातील जनता माय-माऊली हीच माझी ताकद आणि वैभव आहे. त्यामुळे कोणीही पुढे आले तरी त्याला मी हरवू शकतो. माझ्या संघर्षाच्या काळात माढ्यातील मायमाऊली दुर्गामाता बनून माझ्या पाठीशी उभी राहिल्याने मला हत्तीचे बळ मिळाले आहे, असा विश्वास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.येथील गांधी चौकात रात्री उशिरा रयत क्रांती महिला आघाडीच्यावतीने माढा लोकसभा मतदार संघातील ५ हजारहून अधिक महिलांनी नवरात्रीनिमित्त आणलेल्या अंबाबाई मशालीचे स्वागत करण्यात आले. या महिला सन्मान मेळाव्यात खोत बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जि. प.च्या महिला बालकल्याण समिती सभापती सुषमा नायकवडी, रणजित नाईक-निंबाळकर, श्रीकांत घाटगे, सागर खोत, भास्कर कदम, विजय पवार, नगरसेविका कोमल बनसोडे, सुभाष शिंगण, अशोक खोत, संदीप खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.खोत म्हणाले, काहींना वाटत होते, सदाभाऊ एकटा आहे. माढ्यातील ५00 कार्यकर्तेही बरोबर येणार नाहीत. मात्र आज भर पावसाळी वातावरणात पाचशेच काय, पाच हजारहून अधिक माय-माऊली, रणरागिणी माझ्याबरोबर आहेत. माझ्या वाढत्या ताकदीमुळे शत्रूंबरोबरच आप्तस्वकीयांच्या पोटात दुखत आहे. त्यांनी माझ्यावर कपटाने वार केले आहेत, असा हल्ला खा. शेट्टी यांचा नामोल्लेख टाळून त्यांनी केला. या रणरागिणींच्या सोबतीने कपट कारस्थान करणाºयांचा पराभव करणार आहे.काही लोक मातीतल्या माणसाचे नाव घेऊन मातीत राबणाºया माणसांना मातीत घालण्याचे काम करत आहेत. मलाही मातीत घालण्याची भाषा त्यांच्याकडून होत आहे. मात्र अशांना या रणरागिणीच उत्तर देतील. मातीतल्या माणसाला, त्याच्या घामाला सन्मान मिळवून देण्याचे काम रयत क्रांती आघाडीच्या माध्यमातून करणार असल्याचे सांगून, सत्तेपेक्षा माढ्यातील माय-माऊलींचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे, त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर माढ्यात दौरा करणार असल्याचेही ते म्हणाले.नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, सदाभाऊंच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती आघाडीच्या माध्यमातून राज्यातील रयतेचे भले व्हावे, त्यांची प्रगती व्हावी यासाठी माढ्यातील या महिला, भगिनी कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडे घालून आशीर्वाद द्यायला आल्या आहेत. या आघाडीच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी निश्चित स्वरुपात काम केले जाईल.सुषमा नायकवडी म्हणाल्या, शेतकरी, कष्टकºयांचे प्रतिनिधी म्हणून सदाभाऊ खोत शासनामध्ये काम करत आहेत. सरकारमध्ये राहून ते समाजातील सर्व घटकांना न्याय देत आहेत. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. महिलांनी मजबूत संघटन करुन शासनाच्या महिलांविषयक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा.सागर खोत यांनी स्वागत केले. रयत क्रांती आघाडीच्या माध्यमातून शेतकºयांच्या प्रश्नांबरोबरच समाजातील सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. नगरसेविका कोमल बनसोडे यांनी आभार मानले.वेळ पडली तर किडनी देईन..!चळवळीतील कार्यकर्ते आणि माढ्यातील माय-माऊलींच्या आशीर्वादाने मी सत्तेत आहे. तुम्हा सर्वांसाठी सदाभाऊचे दार सताड उघडे आहे. माढ्यातील एकही माणूस वैद्यकीय उपचारापासून वंचित राहणार नाही. तुम्ही मला कधीही हाक मारा, हा सदाभाऊ तुमच्यासाठी धावून येईल. वेळ पडली तर माझ्या किडन्यासुध्दा द्यायला मी मागे-पुढे पाहणार नाही, अशी भावूक साद सदाभाऊंनी घातली.रणरागिणींना फेटे..!गांधी चौकातील मेळाव्यासाठी आलेल्या प्रत्येक माय-माऊलीला फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला. पावसामुळे विस्कळीत झालेला हा मेळावा माढ्यातील माता-भगिनींच्या अलोट उत्साहात झाला. सदाभाऊंप्रती असणाºया कृतज्ञतेची झालर या मेळाव्याला होती.