सांगलीत किरकोळ वादातून गुंड तुकाराम मोटेचा खून, दोघे संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 17:01 IST2022-05-25T10:56:18+5:302022-05-25T17:01:19+5:30

तरुणांकडे बघण्यावरुन वाद झाला. त्यातून हाणामारी झाली. तेव्हा तुकारामला चाकूने भोसकण्यात आले.

Murder of goon Tukaram Mote in a minor dispute in Sangli, two suspects in custody | सांगलीत किरकोळ वादातून गुंड तुकाराम मोटेचा खून, दोघे संशयित ताब्यात

सांगलीत किरकोळ वादातून गुंड तुकाराम मोटेचा खून, दोघे संशयित ताब्यात

संजयानगर : सांगली शहरातील संजयनगर येथील गुंड तुकाराम सुभाष मोटे (वय-२७) याचा किरकोळ वादातून चाकूने भोसकून खून केल्याची घटना काल, मंगळवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी दोघा संशयिताना ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी, तुकाराम मोटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. महिन्यापूर्वी परिसरातील पेट्रोलपंपावर उधार पेट्रोल दिले नाही म्हणून त्याने महिला कर्मचार्‍याचा विनयभंग करुन मारहाण केली होती. तसेच पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर तो जामिनावर मुक्त होता.

एकमेंकाकडे बघण्यावरुन वाद

काल, मंगळवारी संजयनगर परिसरातील तरुणांकडे बघण्यावरुन वाद झाला. त्यातून हाणामारी झाली. यावेळी संशयितांनी तुकारामला चाकूने भोसकले. यात त्याचा मृत झाला. संजयनगर पोलिसांना याची माहिती मिळताच सहायक निरिक्षक संजय क्षीरसागर व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोघांना ताब्यात घेतले आहे. खुनाच्या नेमक्या कारणाबाबत तपास सुरु आहे.

Web Title: Murder of goon Tukaram Mote in a minor dispute in Sangli, two suspects in custody