सदानंद औंधेमिरज : मिरजेतीलसांगलीकर मळा येथे एका तरुणाचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऋषिकेश बाळासाहेब जाधव (वय २५, रा घोरपडे, वाडा मिरज) असे मृत तरुणाचे नाव आहे. सांगलीकर मळा येथील रिकाम्या जागेत ऋषिकेशचा मृतदेह आढळला. याघटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.हल्लेखोरांनी ऋषिकेशचा धारधार हत्याराने निर्घुण खून करुन चेहर्याचा चेंदामेंदा केल्याचे निदर्शनास आले. याघटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक बसवराज तेली, डीवायएसपी अजित टिके, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह श्वानपथक व पोलिस पथकाने घटनास्थळी पाहणी केली. मृत तरुणाच्या चेहर्याचा चेंदामेंदा केल्याने पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेऊन कपड्यावरुन ओळख पटविली. ऋषिकेशचा रात्रीच्या सुमारास खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या खूनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
सांगलीतील मिरजेत युवकाचा धारधार शस्त्राने खून, नेमकं कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 18:44 IST