Crime News Sangli: किरकोळ वादातून वेटरचा गळा चिरून खून, एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 17:19 IST2022-06-18T17:14:48+5:302022-06-18T17:19:52+5:30
दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यातून जगताप याने पिसाळ याचा चाकूने गळा चिरला.

Crime News Sangli: किरकोळ वादातून वेटरचा गळा चिरून खून, एकास अटक
तासगाव : तासगाव-विटा रस्त्यावरील वंजारवाडी (ता. तासगाव) हद्दीतील एका ढाब्यावर एका वेटरने दुसऱ्या वेटरचा चाकूने गळा चिरून खून केला. हणमंत श्रीरंग पिसाळ (रा. बावधन, वाई) असे मृताचे नाव आहे. किरकोळ कारणातून झालेल्या वादातून हा प्रकार घडला. काल, शुक्रवारी (दि.१७) रात्री उशिरा ही घटना घडली.
याप्रकरणी सुशांत बजरंग जगताप (रा. बस्तवडे, ता. तासगाव) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत ढाबा मालक श्रीकांत दत्तात्रय खोत यांनी फिर्याद दाखल केली आहे.
तासगाव-विटा रस्त्यावर वंजारवाडी हद्दीत दोस्ती ढाबा आहे. या ढाब्यावर जगताप व पिसाळ हे दोघेही वेटर म्हणून काम करीत होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत हणमंत पिसाळ आणि सुशांत जगताप या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यातून जगताप याने पिसाळ याचा ढाब्यातील चाकूने गळा चिरला. या घटनेने खळबळ उडाली.
याप्रकरणी जगताप याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटकही करण्यात आली. जगतापला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे करीत आहेत.