सांगलीत रक्तरंजित राजकारण! उपसरपंच निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्याची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 17:48 IST2021-03-04T17:07:53+5:302021-03-04T17:48:23+5:30
BJP Shiv sena Clashes in Grampanchayat Election, Shivsena Worker Murder in Sangli ग्रामपंचायतीमध्ये अकरा पैकी आठ सदस्य खासदार संजय पाटील गटाचे तर तीन सदस्य आमदार सुमनताई पाटील गटाचे आहेत

सांगलीत रक्तरंजित राजकारण! उपसरपंच निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्याची हत्या
सांगली : सांगलीत आज रक्तरंजित राजकारण घडले आहे. उपसरपंच निवडणुकीत भाजपमधून फुटून राष्ट्र्वादीत गेलेल्या ग्रामपंचायत सदस्याची भाजप कार्यकर्यांकडून काठ्यांनी मारहाण करून हत्या केली. उपसरपंच निवडीवरुन बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे जनार्दन काळे (वय ५७) या राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला. गुरुवारी दुपारी (दि. ४) दुपारी दीडच्या दरम्यान ही घटना घडली. भाजप व राष्ट्रवादीच्या गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत कार्यकर्तेही जखमी झाले आहेत.
या मारामारीत गणेश पाटील हे ग्रामपंचायत सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय आठ ते दहा कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. कवठेमहांकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला.
नामदेव पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बुधवारी (दि. ४) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, ग्रामपंचायतीमध्ये अकरा पैकी आठ सदस्य खासदार संजय पाटील गटाचे तर तीन सदस्य आमदार सुमनताई पाटील गटाचे आहेत. यातील खासदार संजय पाटील गटाचे दोन सदस्य फोडून आपला उपसरपंच करण्याची रणणिती आमदार सुमनताई पाटील गटाने आखली होती. उपसरपंच निवडीचा कार्यक्रम सुरु होताच ग्रामपंचायत सदस्य मतदानासाठी येत असताना ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांना भिडले.
काठ्यांच्या सहाय्याने तुंबळ हाणामारी सुरु झाली. हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग जनार्दन काळे यांना काठ्यांचा मार बसल्याने गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असतानाच मृत्यू झाला. पांडूरंग काळे भाजपच्याच घोरपडे गटाचे होते, पण ते निवडणुकीत फुटून राष्ट्रवादीत गेले. दरम्यान या घटनेमुळे तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात खळबळ उडाली आहे.