गणेश मंडळासाठी महापालिकेकडून एक खिडकी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:46+5:302021-08-27T04:29:46+5:30

सांगली : शहरातील गणेश मंडळांना मंडप उभारणीची परवानगी देण्यासाठी महापालिकेच्या वतीने एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक ...

Municipal Corporation opens a window for Ganesh Mandal | गणेश मंडळासाठी महापालिकेकडून एक खिडकी सुरू

गणेश मंडळासाठी महापालिकेकडून एक खिडकी सुरू

सांगली : शहरातील गणेश मंडळांना मंडप उभारणीची परवानगी देण्यासाठी महापालिकेच्या वतीने एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रीतसर परवानगी घेऊनच मंडप उभारावेत, असे आवाहन उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.

यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. गतवर्षी शहरात मंडळांनी केवळ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. देखावे, सजावटीला फाटा दिला होता. महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे. याबाबत रोकडे म्हणाले, गणेशोत्सव मंडळांना रीतसर परवाना काढण्यासाठी एक खिडकी कक्ष सुरू केला आहे. महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयांत हा कक्ष असेल. मंडळांनी परवाना घेऊनच मंडप उभारावेत. विनापरवाना मंडप उभारणाऱ्या मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी गणेशमूर्तींचे नदी, विहीर, तलावामध्ये विसर्जन करण्याऐवजी महापालिकेच्या मूर्तिदान केंद्रात दान कराव्यात. मूर्तीचे योग्य पद्धतीने जतन व पुनर्वापर करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मूर्तिकार, स्वयंसेवी संस्था, मंडळे आदींनी प्रभाग समिती कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Municipal Corporation opens a window for Ganesh Mandal