शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणची सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दादागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST

विटा : सध्या महावितरण कंपनीने सामान्य वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांना वेठीस धरायला सुरुवात केली असून, शेती पंपाच्या मीटरचे रिडिंग ...

विटा : सध्या महावितरण कंपनीने सामान्य वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांना वेठीस धरायला सुरुवात केली असून, शेती पंपाच्या मीटरचे रिडिंग घेणाऱ्या एका बड्या कंपनीच्या भाेंगळ कारभाराला क्लीनचिट देत महावितरणने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दादागिरी सुरू केली आहे. महावितरणने हा मनमानी कारभार तात्काळ बंद करावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस ॲड. सुभाष पाटील यांनी दिला आहे.

सुभाष पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची ऐन शेतीच्या हंगामात अडवणूक करण्यासाठीच घाऊक प्रमाणात शेती पंपाची वीज बंद करण्याचा प्रकार सुरू आहे. जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर महिनाभर पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पिके पाण्याला आली आहेत. अशावेळी महावितरणने शेती पंपाची वीज तोडून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा उद्योग सुरू केला आहे.

कोरोनाचा सगळ्यात मोठा दणका शेती व शेतकऱ्यांनाच बसला आहे. त्यातच महावितरण आपल्या चुका झाकून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. गेल्या ६ वर्षांपासून शेती पंपाच्या मीटरचे रिडिंगच घेतलेले नाही. संपूर्ण राज्यातील शेतीपंपाच्या मीटर रिडिंगचा ठेका एका बड्या खासगी कंपनीला दिला आहे. ती कंपनी शेती पंपाच्या मीटरचे रिडिंग घेत नाही; पण वीज वितरण कंपनी मात्र न चुकता कंपनीला कराराचे काेट्यवधी रुपये अदा करत आहे.

शेती पंपाचे अनेक मीटर सध्या बंद आहेत. काही जळलेले आहेत. अनेक मीटर आणि विद्युतपंप यांचा ताळमेळच नाही. तरीही मीटर भाडे चालूच आहे. हा सगळा गोंधळ लपविण्यासाठी सामान्य वीज ग्राहकाला वेठीस धरले जात आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. वीज मंडळाच्या या अन्यायाचा शेतकरी कामगार पक्ष जाहीर निषेध करत आहे. महावितरणने हा गोंधळ तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करतील, असेही सुभाष पाटील म्हणाले.

यावेळी इंद्रजित पाटील, संजय मोरे, जयराम मोरे, सागर पाटील, रणजित पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.