शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
5
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
6
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
7
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
9
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
10
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
11
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
12
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
15
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
16
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
17
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
18
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
19
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
20
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !

आता भाजप शरद पवारांना धक्का देणार? विनोद तावडेंनी घेतली बड्या नेत्याची भेट; बंद दाराआड चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 19:33 IST

Vinod Tawde Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. भाजपा नेते विनोद तावडे आज सांगली दौऱ्यावर होते.

Vinod Tawde Sharad Pawar ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून भाजपा नेते विनोद तावडे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील शरद पवार ( Sharad Pawar ) गटातील नेते माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. 

“...तर शरद पवार ४ ते ५ वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला

काही दिवसापूर्वी कोल्हापूरातील भाजपा नेते समरजीतसिंह घाटगे यांनी भाजपामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे शरद पवार भाजपाला आणखी एक धक्का बसणार देणार असल्याचे बोलले जात आहे. इंदापुरचे बाजपा नेते हर्षवर्धन पाटील, अहमदनगरचे भाजपा नेते विवेक कोल्हे हेही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता शरद पवार गटातील नेताही भाजपामध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. 

विनोद तावडेंनी बड्या नेत्याची भेट घेतली 

आज सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला भाजपा नेते विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी मेळावा संपल्यानंतर शरद पवार गटाचे नेते माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड राजकीय चर्चा चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार नाईक भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसापासून सुरू आहेत.  याआधीही नाईक भाजपामध्येच होते, पण महाविकास आघाडी सरकार काळात त्यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तावडेंच्या भेटीनंतर नाईक आता पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. 

शिराळा मतदारसंघातील समीकरण काय?

शिराळा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक आहेत. याआधी शिवाजीराव नाईक यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता. पण, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नाईक यांचा पराभव झाला. दरम्यान, आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून सम्राट महाडिक यांचे नाव चर्चेत आहे. महाडिक यांनी यावेळी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षापासून आमदारकीसाठी तयारी केली आहे. तर, दुसरीकडे भाजपा (BJP) नेते सत्यजित देशमुख यांचीही ताकद या मतदारसंघात मोठी आहे, यामुळे भाजपा यावेळी नेत्यांची मोट बांधून पुन्हा एकदा शिराळा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेBJPभाजपाSangliसांगलीSharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटील