जागतिक महिला दिनानिमित्त मिरजेत कोविड जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:24 IST2021-03-08T04:24:59+5:302021-03-08T04:24:59+5:30

मिरज : मिरजेतील विद्यानगर येथे महापालिका व ओम साई योगा मंडळातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कोविड जनजागृती अभियान पार ...

Mirjet Kovid Awareness on the occasion of International Women's Day | जागतिक महिला दिनानिमित्त मिरजेत कोविड जनजागृती

जागतिक महिला दिनानिमित्त मिरजेत कोविड जनजागृती

मिरज : मिरजेतील विद्यानगर येथे महापालिका व ओम साई योगा मंडळातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कोविड जनजागृती अभियान पार पडले.

कोविड लसीकरणाचा कोणताही दुष्परिणाम नसल्याचे व लस पूर्णतः सुरक्षित असल्याचे डॉ. अपर्णा पुजारी यांनी सांगितले. कोविडबाबत महिलांनी समाजात जनजागृती केल्यास ती प्रभावी ठरेल, असे सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी सांगितले. सर्व क्षेत्रांत महिला कार्यरत आहेत हे दर्शविण्यासाठी महिला विविध वेशभूषेत सहभागी झाल्या. सविता पाटील, अंजली पाटील, अनिता कावरे, तेजस्विनी शिरगुप्पे, जयंती आचार्य, सायली लोणिष्टे, संगीता डोंगरे-माळी, आरती आचार्य, सरोजनी खटावकर, विदुलता घारे, अपर्णा पुजारी, अनुपमा भोसले, वर्षा ओसवाल, मीनाक्षी फडके यांनी विविध भूमिका सादर केल्या. कोवीड जनजागृती अभियानात भाग घेणाऱ्या महिलांना प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी महेंद्रसिंग चुंडावत, डॉ. रवींद्र फडके उपस्थित होते. मीनाक्षी फडके यांनी स्वागत केले. राजकुंवर चुंडावत यांनी आभार मानले.

Web Title: Mirjet Kovid Awareness on the occasion of International Women's Day