शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

मिरजमध्ये मिरची व्यापाऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: February 1, 2015 00:51 IST

व्यवसायात नुकसान : कर्जाची विवंचना

मिरज : व्यवसायात नुकसान होऊन कर्जबाजारी झाल्याने लक्ष्मण बाबू पवार (वय ५५, रा. नदीवेस, माळी गल्ली) या मिरची व्यापाऱ्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. सांगली मार्केट यार्डातील व्यापाऱ्याने थकित रकमेचे व्याज वसूल केल्यामुळे लक्ष्मण पवार यांनी आत्महत्या केल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिसांत केली आहे. लक्ष्मण पवार मिरजेसह परिसरातील गावात आठवडा बाजारात मिरची विक्रीचा व्यवसाय करीत होते. गेल्या वर्षभरात मिरची व्यवसायात नुकसान झाल्याने सांगली मार्केट यार्डातील बापू नामक व्यापाऱ्याचे ९० हजार रुपये कर्ज झाले होेते. मिरचीचे देणे थकित असल्याने पवार यांना माल देणे बंद करण्यात आल्यामुळे पवार यांचा व्यवसाय पडला होता. पवार यांनी ४० हजार रुपये जमवून व्यापाऱ्यांला दिले. मात्र ही रक्कम थकित कर्जाचे व्याज म्हणून जमा करून घेऊन व्यापाऱ्याने पवार यांना व्यवसायासाठी पुन्हा माल देण्यास नकार दिला. थकित रक्कम दिल्यानंतरही माल मिळत नसल्याने पवार अस्वस्थ होते. व्यवसाय बंद असताना कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी आज सकाळी घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. सांगलीतील बापू या व्यापाऱ्याने थकित रकमेचे व्याज वसूल केल्याने लक्ष्मण पवार यांनी आत्महत्या केल्याची तक्रार पवार याच्या कुटुंबियांनी शहर पोलिसांत केली आहे. मूळचे कागवाडचे लक्ष्मण पवार मिरची विक्री व्यवसाया निमित्ताने मिरजेत स्थायिक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. (वार्ताहर)