Sangli Crime: नात्यातीलच तरुणाने अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:04 IST2025-08-23T17:03:35+5:302025-08-23T17:04:11+5:30

सुटीसाठी नातेवाइकांकडे आल्यानंतर तसेच मुंबईला गेल्यानंतर मुंबई परिसरात केले अत्याचार

Minor girl raped in Tasgaon, Mumbai Victim is pregnant, case registered | Sangli Crime: नात्यातीलच तरुणाने अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती, गुन्हा दाखल

Sangli Crime: नात्यातीलच तरुणाने अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती, गुन्हा दाखल

तासगाव : अल्पवयीन मुलीवर मे महिन्यात सुटीसाठी नातेवाइकांकडे आल्यानंतर तासगाव तालुक्यातील एका गावात, तसेच मुंबईला गेल्यानंतर मुंबई परिसरात नात्यातीलच एका अल्पवयीन तरुणाने बलात्कार केल्याची फिर्याद तासगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. संबंधित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अधिक तपास तासगाव पोलिस करीत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटना दोन ठिकाणी घडली. १३ मे २०२५ रोजी पहाटे तासगाव तालुक्यातील एका गावात नातेवाइकांच्या घरी आणि २५ मे २०२५ रोजी सकाळी मुंबईतील चुनाभट्टी परिसरातील राहत्या घरी अत्याचार झाल्याची फिर्याद देण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर पीडित मुलगी १५ आठवड्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आल्यानंतर या अत्याचाराची माहिती कुटुंबीयांना कळाली होती. 

याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(२)(i), ६५(१) तसेच पोक्सो कायदा २०१२ चे कलम ४, ६, ८, १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद २१ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास तासगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे करीत आहेत.

Web Title: Minor girl raped in Tasgaon, Mumbai Victim is pregnant, case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.