Sangli Crime: अत्याचारातून अल्पवयीन युवती गर्भवती, तरुणास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:17 IST2025-04-24T14:17:14+5:302025-04-24T14:17:30+5:30
सांगली : मिरज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवती लैंगिक अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडितेने संशयित ...

Sangli Crime: अत्याचारातून अल्पवयीन युवती गर्भवती, तरुणास अटक
सांगली : मिरज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवती लैंगिक अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडितेने संशयित बाहुबली ऊर्फ मानतेश दशरथ डुक्की (रा. वसंतनगर, नांद्रे, ता. मिरज) याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित युवती १७ वर्षे तीन महिन्यांची (अल्पवयीन) आहे. ती मिरज तालुक्यातील एका गावात राहते. पीडित युवती आणि बाहुबली या दोघांची ओळख होती. बाहुबली याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून घरासमोरील एका रिकाम्या घरात वारंवार घेऊन जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. जानेवारी २०२४ पासून हा प्रकार सुरू होता. या प्रकारातून युवती तीन महिन्यांची गर्भवती राहिली.
जिवे मारण्याची दिली धमकी
तिने हा प्रकार बाहुबली याला सांगितला. तेव्हा बाहुबली याने तिला हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ती घाबरली. अखेर तिने घरातील लोकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री फिर्याद दिली. त्यानुसार बाहुबली याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आली आहे. बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.