शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मंत्री जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात तडजोडीच्या राजकारणाचे संकेत, आगामी पालिका निवडणुकीत कुरघोड्यांची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 15:59 IST

एकीकडे राष्ट्रवादी भक्कम असली तरीही पालकमंत्री जयंत पाटील यांचा बालेकिल्ला डळमळीत करण्यासाठी भाजपमधील वरिष्ठ नेते इस्लामपुरात तळ ठोकणार, हेही निश्चित आहे.

अशोक पाटीलइस्लामपूर : आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची गर्दी होणार हे निश्चित आहे. यातूनही उमेदवारी मिळाली नाही तर कुरघोड्यांला उत येणार आहे. याचाच फायदा विकास आघाडीला होण्याची शक्यता गृहीत धरून पालिकेच्या राजकारणात सक्रिय नेत्यांनी आतापासूनच तयारी चालविली आहे. दोन्ही गटातील नेते आपला प्रभाग सुरक्षित करण्यासाठी ‘सेटलमेंट’च्या प्रयत्नात असल्याची चर्चा पालिका निवडणुकीअगोदरच सुरू झाली आहे.राष्ट्रवादीमध्ये संग्राम पाटील, सुभाष सूर्यवंशी, बाबा सूर्यवंशी, चिमन डांगे, विश्वास डांगे, पीरअली पुणेकर, संजय कोरे, अशोक देसाई, अंगराज पाटील, आनंदराव मलगुंडे, शहाजी पाटील, संदीप पाटील, दादा पाटील, खंडेराव जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. याव्यतिरिक्त मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते राष्ट्रवादीतून इच्छुक आहेत. त्यामुळे नाराजांची संख्या वाढणार आहे. यातूनच कुरघोड्यांचे राजकारण रंगणार आहे.एकीकडे राष्ट्रवादी भक्कम असली तरीही पालकमंत्री जयंत पाटील यांचा बालेकिल्ला डळमळीत करण्यासाठी भाजपमधील वरिष्ठ नेते इस्लामपुरात तळ ठोकणार, हेही निश्चित आहे. परंतु विकास आघाडीतील सर्व घटक पक्ष व नेते एकत्रित येणार का? यावर आजही प्रश्नचिन्ह आहे. माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील आपल्या ताकदीवर किती उमेदवार देणार? महाडिक गटाकडून कपिल ओसवाल, अनिता ओसवाल यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. याशिवाय सतीश महाडिक, जलाल मुल्ला, चेतन शिंदे, सुजित थोरात आदींनीही निवडणुकीची तयारी केली आहे.विकास आघाडीमध्ये विक्रम पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या घरातील सुप्रिया पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. यादरम्यान काही नेते एकमेकांशी तडजोडी करून नुरा लढती करण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र आहे.  जेणेकरून इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात आपले अस्तित्व अबाधित राहील.शिवसेना स्वबळाच्या भूमिकेवर अद्याप ठामशिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार स्वबळाचा नारा सोडण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादी व शिवसेनेला आघाडीचा धर्म पाळावा लागला तर आगामी पालिका निवडणुकीची समीकरणे बदलतील हे मात्र निश्चित.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना