रुपयाच्या चॉकलेटने लाखमोलाचे दात धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:42+5:302021-08-27T04:29:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दिवसभर दंगामस्ती करणाऱ्या मुलांना शांत राखण्यासाठी चॉकलेटचे आमिष म्हणजे पालकांसाठी जादुची कांडी ठरते. पण ...

Millions of teeth endangered by rupee chocolate | रुपयाच्या चॉकलेटने लाखमोलाचे दात धोक्यात

रुपयाच्या चॉकलेटने लाखमोलाचे दात धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दिवसभर दंगामस्ती करणाऱ्या मुलांना शांत राखण्यासाठी चॉकलेटचे आमिष म्हणजे पालकांसाठी जादुची कांडी ठरते. पण याच चॉकलेटच्या सवयीमुळे आपण मुलांच्या दातांचे आरोग्य धोक्यात आणत आहोत, याकडे मात्र पालकांचे दुर्लक्ष होते. अशा पालकांना डॉक्टरांनी `जरा जपून` असा सल्ला दिला आहे.

चॉकलेटमधील साखर, चिकटपणा दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक ठरतो. विशेषत: दुधाच्या दातांसाठी तर अधिकच धोकादायक ठरतो. दुधाचे दात किडतात. ते पडून नव्याने येणारे कायमचे दात वेडेवाकडे येऊ शकतात. दातांचे उपचार महागडे असल्याने त्यांचे आरोग्य जपणे हीच महत्त्वाची बाब ठरते, असे दंतवैद्य प्रा. डॉ. तनुश्री दळवी यांनी सांगितले.

बॉक्स

चॉकलेटचा मोह टाळलेलाच बरा!

- दातांचे आरोग्य सांभाळायचे असेल, तर चॉकलेटचा मोह टाळलेलाच बरा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

- चॉकलेटस् खायचीच असतील तर ती जेवणावेळी खावीत आणि नंतर ब्रश करावा, असेही तज्ज्ञांनी सुचविले आहे.

- रात्री झोपण्यापूर्वी चॉकलेट अजिबात खाऊ नयेत, किंबहुना आठवड्यातून एकदाच खाणे कधीही दातांसाठी आरोग्यदायी ठरते.

बॉक्स

तोंडाचे सौंदर्य बिघडेल

- सर्रास लहान मुलांचे दुधाचे दात चॉकलेट-गोळ्या खाण्याने किडतातच हा अनुभव आहे.

- रोगट दात वेळेत न पडल्याने नव्या दातांना उगवण्यात अडथळे येतात, त्यामुळे वेडेवाकडे होतात.

- रोगट दात तोंडाच्या दुर्गंधीला कारणीभूत ठरतात, त्यातून आरोग्याच्या समस्याही उदभवू शकतात.

- दुधाचे दात किडले तरी उपचार करता येतात, पण प्रतिबंधच महत्त्वाचा आहे.

बॉक्स

चॉकलेट टाळा, दात सांभाळा

- दात घासण्यासाठी सर्क्युलर ब्रशिंग किंवा फोन्स टेक्निक अशी काही आरोग्यदायी तंत्रे तज्ज्ञांनी सांगितली आहेत.

-चॉकलेट खाल्ल्यानंतर गुळण्या करणे, झोपण्यापूर्वी ब्रश करणे, दिवसातून किमान तीनदा दात घासणे या सवयी दातांचे आरोग्य वाढवतात.

कोट

किडण्यापूर्वीच प्रतिबंध महत्त्वाचा

दात किडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय करावेत. आरोग्यदायी ब्रशिंगची तंत्रे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. कीड टाळण्यासाठी वर्षातून दोनदा फ्लुरोईड जेलची प्रक्रिया डॉक्टरकडून करून घ्यावी. दुधाचे दात किडले तरी फिलिंग करता येतात. मुलांना चॉकलेटचा मोह सुटत नसेल, तर लगेच दात घासण्याची सक्ती करावी. जिभेवरील थरही स्वच्छ करून घ्यावा. दुधाच्या दातांकडे दुर्लक्ष केल्यास नंतर उगवणाऱ्या कायमच्या दातांचे आरोग्य बिघडू शकते.

- प्रा. डॉ. तनुश्री दळवी, व्याख्याता, भारती दंत महाविद्यालय

Web Title: Millions of teeth endangered by rupee chocolate