शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’चे थकित वीज बिल कोटीत

By admin | Updated: February 13, 2015 22:53 IST

तोडग्याबाबत उद्या बैठक : पाणीपट्टी न भरणाऱ्या शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज

अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ -म्हैसाळ पाणी योजनेच्या वीज बिलाची थकबाकी मोठी असल्याने जत, कवठेमहांकाळ, मिरज व तासगावच्या काही भागास दुष्काळाचा फटका सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी न भरल्याने म्हैसाळ योजनेचे पाणी या तालुक्यांना मिळणे अवघड झाले आहे. याबाबत तोडगा काढण्याच्यादृष्टीने महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे यांनी जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक रविवार, दि. १५ रोजी बोलाविली आहे. ‘पाणीपट्टी भरू आणि दुष्काळावर मात करू’ असा नारा त्यांनी दिला आहे. या बैठकीतील तोडग्याकडे शेतकऱ्यांसह दुष्काळी भागाचे लक्ष लागले आहे.
अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या खाईत असणाऱ्या जत, कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव या तालुक्यांना बाहेर काढण्यासाठी विठ्ठलदाजी पाटील यांनी वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने म्हैसाळ पाणी योजनेला जन्म दिला. त्यानंतर शिवाजीराव शेंडगे, नानासाहेब सगरे, अजितराव घोरपडे, आर. आर. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शिवारात कृष्णेचे पाणी आणले. ही योजना बारमाही सुरू ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा करावा लागतो. परिणामी वीज बिलाची रक्कमही वाढते.
या योजनेचे पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याची ठरलेली पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. मात्र शेतकऱ्यांनी ती भरलेली नसल्याने वीज बिलाची थकबाकी कोटीच्या घरात पोहोचली आहे. राज्यात पूर्वीच्या आघाडी सरकारमधील आर. आर. पाटील व डॉ. पतंगराव कदम यांच्या सततच्या प्रयत्नामुळे टंचाई निधीतून या योजनेचे वीज बिल भरण्यात येत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याची तोशीस लागली नाही. आर. आर. पाटील यांनी तर तब्बल तीन वर्षे राजकीय ताकद पणाला लावत ही योजना सुरु ठेवली. मात्र आता सत्तेवर आलेल्या भाजप-सेना सरकारने थकबाकी भरण्यास सांगितले आहे.
म्हैसाळ योजना अविरतपणे चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय नियमानुसार पाणीपट्टी भरून शासनास मदत करणे गरजेचे आहे. परंतु पाणीपट्टी भरण्याची मानसिकता अद्याप शेतकऱ्यांमध्ये पूर्णपणे तयार झालेली दिसून येत नाही.
वापरलेल्या पाण्याची पाणीपट्टी भरल्यास या योजनेचे वीज बिल प्रशासनाला भरता येईल व ही योजना कायम सुरू राहील. योजना कायम सुरू राहिल्यास शेतीला बारमाही पाणी मिळून येथील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडणार आहे, हे अद्याप शेतकऱ्यांच्या लक्षात आलेले दिसून येत नाही.
त्यामुळे या सर्व प्रश्नांवर मार्ग काढून या जत, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव या दुष्काळी पट्ट्यातील शेती व शेतकऱ्यांना तारण्यासाठी तालुक्याचे प्रमुख विकास केंद्र असलेल्या महांकाली कारखान्याने व राष्ट्रवादीचे तालुक्याचे नेते विजयराव सगरे यांनी पुढाकार घेतला आहे.
या योजनेच्या टप्प्यात येणाऱ्या कार्यक्षेत्रातील वसंतदादा पाटील कारखाना, मोहनराव शिंदे कारखाना, जत कारखाना अन् महांकाली कारखाना यांचे अध्यक्ष तसेच मिरज, कवठेमहांकाळ, जत, तासगाव तालुक्यांचे तहसीलदार, प्रांत व म्हैसाळ योजनेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक ‘महांकाली’च्या कार्यस्थळावर रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.
या बैठकीत ज्या कारखान्यांकडे म्हैसाळ याजनेच्या ओलिताखालील सिंचन क्षेत्रावरील ऊस गाळप केला जाईल, त्या कारखान्याकडे त्या शेतकऱ्यांच्या बिलातून शासकीय नियमानुसार पाणीपट्टी वसूल करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर डाळिंब, द्राक्षे, केळी, ज्वारी, इतर फळबागा व बागायती शेती केली आहे, त्या शेतकऱ्यांकडून रेव्हेन्यू (महसूल) विभागाकडूनही पाणीपट्टी नियमानुसार वसूल करण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे. जे शेतकरी म्हैसाळ योजनेचे पाणी वापरून पाणीपट्टी भरण्यात असमर्थता दर्शवतील, अशा शेतकऱ्यांवर महसूल विभागाचे अधिकारी निर्णय घेऊन त्यांच्या सात-बारावर नियमानुसार पाणीपट्टीचा बोजा चढविण्याचा निर्णय घेतील, यावरही या बैठकीत चर्चा होणार
आहे.
एकूणच दुष्काळी परिस्थितीतील शेती व शेतकऱ्यांचा विचार करता, म्हैसाळ योजना बारमाही होणे ही येथील शेती व शेतकऱ्यांची निकडीची गरज आहे. परंतु शेतकऱ्यांनीही म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे शेतीतून आर्थिक उत्पन्न निघत असेल, तर स्वत:च्या प्रगतीसाठी पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे. ही पाणीपट्टी भरण्यास ही योजना कायमस्वरुपी सुरू राहून दुष्काळ हटविणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या असहकार्यामुळे परत पाणी उशाला अन् कोरड घशाला म्हणत कृत्रिम मानवनिर्मित दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे, असेच म्हणावे लागेल.


म्हैसाळ योजना कायमस्वरुपी सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरणे गरजेचे असून, यामुळे येथील शेती बारमाही होऊन दुष्काळ हटेल व आर. आर. आबांच्या स्वप्नातील हिरवागार तालुका निर्माण होईल.
- विजय सगरे,
अध्यक्ष, महांकाली कारखाना



योजना बारमाही होण्याची गरज
म्हैसाळ योजना बारमाही होणे ही येथील शेती व शेतकऱ्यांची निकडीची गरज आहे. या योजनेचे पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याची ठरलेली पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. मात्र शेतकऱ्यांनी ती भरलेली नसल्याने वीज बिलाची थकबाकी कोटीच्या घरात पोहोचली आहे. वापरलेल्या पाण्याची पाणीपट्टी भरल्यास या योजनेचे वीजबिल प्रशासनाला भरता येईल व ही योजना कायम सुरू राहील. योजना कायम सुरू राहिल्यास शेतीला बारमाही पाणी मिळून येथील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडणार आहे, हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलेले दिसून येत नाही.