सांगली : घराचे वीज आणि पाणी कनेक्शन नावावर करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपये लाच घेताना ‘म्हाडा’च्या उपविभागीय कार्यालयातील शिपाई विजय यशवंत गंगाधर (४८, रा. साखराळे, ता. वाळवा) याला रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सकाळी उपविभागीय कार्यालयात ही कारवाई केली.तक्रारदार यांनी ‘म्हाडा’कडून घर खरेदी केले होते. या घराचे वीज आणि पाणी कनेक्शन नावावर करण्यासाठी ‘म्हाडा’च्या सांगलीतील उपविभागीय कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक होते. तक्रारदार यांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी तेथे कार्यरत असणाऱ्या शिपाई विजय गंगाधर याने तक्रारदार यांच्याकडे एक हजार रुपये लाचेची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी (दि. १५) तक्रार अर्ज केला.तक्रार अर्जानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. शिपाई गंगाधर याने तक्रारदार यांना प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पथकाने म्हाडाच्या कार्यालयात सापळा लावला. शिपाई विजय गंगाधर याने तक्रारदार यांच्याकडून एक हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यास तत्काळ पकडण्यात आले.
Web Summary : A MHADA employee in Sangli was arrested for accepting a ₹1,000 bribe to issue a No Objection Certificate (NOC) for electricity and water connections. Anti-Corruption Bureau officials caught him red-handed at the MHADA office after a complaint was filed.
Web Summary : सांगली में म्हाडा का एक कर्मचारी बिजली और पानी के कनेक्शन के लिए अनापत्ति प्रमाण पत्र (एनओसी) जारी करने के लिए ₹1,000 की रिश्वत लेते हुए गिरफ्तार किया गया। भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो के अधिकारियों ने शिकायत दर्ज होने के बाद उसे म्हाडा कार्यालय में रंगे हाथों पकड़ा।