शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतागृहे नसलेली व्यापारी संकुले बेकायदा

By admin | Updated: July 16, 2015 00:09 IST

जिल्हा सुधार समितीचा सर्व्हे : परिपूर्ती प्रमाणपत्र ठरणार बेकायदेशीर

सांगली : जिल्हा सुधार समितीने शहरातील व्यापारी व रहिवासी संकुलांमध्ये स्वच्छतागृह, पाण्याची सोय या सोयी-सुविधांचा सर्व्हे हाती घेतला आहे. विश्रामबाग ते राममंदिर परिसरातील बहुतांश व्यापारी संकुलांमध्ये स्वच्छतागृहे नसल्याचे प्राथमिक टप्प्यात आढळून आले आहे. अशी व्यापारी संकुले बेकायदा ठरणार असून त्यांना महापालिकेने दिलेले परिपूर्ती प्रमाणपत्रही वादाच्या भोवऱ्यात अडकणार आहेत. महाराष्ट्र महापालिका कायदा कलम १७९ नुसार व्यावसायिक व रहिवासी इमारतीमध्ये काम करणाऱ्यांसाठी व त्याठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी शौचालय, स्वच्छतागृह, पाण्याची सोय करणे बंधनकारक आहे. या सोयी-सुविधा मिळणे हा नागरिकांचा, विक्रेत्यांचा व इमारतीमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. परंतु महापालिकेने हा नियम डावलून अनेक बांधकाम परवाने दिले आहेत. त्यासाठी जिल्हा सुधार समितीने अशा इमारतींचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. समितीचे प्रा. अजित माने, सुरेश टेंगले, शंकर माळी, अल्ताफ पटेल व इतर कार्यकर्त्यांनी विश्रामबाग ते राममंदिर या परिसरातील इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करून सर्व्हेला सुरुवात केली आहे. शहरातील तुलसी अपार्टमेंट, सोना क्लिनिक, हॅपी होम, कृष्णा आर्केड, बसवेश्वर कॉम्प्लेक्स, रामप्रसाद कॉम्प्लेक्स, राहुल टॉवर्स, राजरत्न हाईटस्, इंदुमती कॉम्प्लेक्स, कोरे कॅपिटल, डॉ. रणभिसे कॉम्प्लेक्स, राहुल एम्पायर, देवल कॉम्प्लेक्स, शिवकुमार कॉम्प्लेक्स, व्यंकटेश वंदन, मनोहर अपार्टमेंट, सिद्धिविनायक लॅन्डमार्क, मंगलधाम कॉम्प्लेक्स, श्रीलक्ष्मी चेंबर्स या इमारतींचा प्राथमिक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत शहरातील अनेक इमारतींमध्ये स्वच्छतागृहे नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशा इमारती या कायद्याप्रमाणे बेकायदेशीर ठरतात. या बेकायदेशीर इमारतींना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परिपूर्ती प्रमाणपत्रही दिले आहे. त्यामुळे यात मोठा गोलमाल असून, परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी सुधार समितीच्यावतीने प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रा. माने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नगरसेवकांना धास्तीसुधार समितीने पालिका कायद्यातील तरतुदींचा आधार घेत एरिया सभा घेण्याचा आग्रह धरला आहे. त्यासाठी आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजाविली आहे. त्यामुळे नगरसेवकांचे धाबे दणाणले असून प्रशासनाने प्रभागात एरिया सभा घ्यावी, यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा सुरू केला आहे. लवकर प्रशासनाना नगरसेवक पत्रही देणार आहेत.