सांगली : बीड ते सांगली असा प्रवास करून सांगलीत आलेल्या एमबी लिंक्स कंपनीच्या ट्रॅव्हल्स बसला सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास तरूण भारत स्टेडियमसमोर थांबल्यानंतर चालकाच्या केबिनमध्ये अचानक आग लागली. चालक व इतरांनी प्रसंगावधान राखून आपत्कालीन दरवाजातून सात प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. तेवढ्यात आगीने रौद्ररूप धारण केले.अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. आगीच प्रवाशांचे साहित्य, कोचिंग जळून खाक होऊन केवळ सांगाडाच उरला. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे.एमबी लिंक्स कंपनीची ट्रॅव्हल्स बस (एमएच ०९ जीजे ६९९७) बीड ते सांगली असा प्रवास करून सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास मिरजेतून सांगलीत आली. मिरजेपासून सर्व प्रवासी उतरत आल्यामुळे सांगलीत आल्यानंतर केवळ सात प्रवासी होते. महापालिकेसमोरून बसस्थानकाकडे जात असताना तरूण भारत स्टेडियम समोरील बंद पडलेल्या पेट्रोलपंपाजवळ चालकाने बस थांबवली.तेवढ्याच चालकाच्या केबिनमधून धूर येऊ लागला. त्यामुळे मागे बसलेले प्रवासी घाबरले. तेवढ्यात आग लागली. चालकाने व प्रवाशांनी प्रसंगावधान राखून तत्काळ मागील बाजूस असलेल्या आपत्कालीन मार्गामधून प्रवाशांना खाली उतरवले. तेवढ्यात रस्त्यावरून जाणारे नागरिकही मदतीसाठी धावले.हा सर्व प्रकार सुरू असतानाच चालकाच्या केबिनमध्ये आग लागली. महापालिका अग्निशमन दलाला कळवताच स्टेशन चौकातून आणि टिंबर एरियातून दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी आल्या. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. तासाभरात आग आटोक्यात आली. आगीमध्ये प्रवाशांच्या आतमध्ये राहिलेल्या बॅग्ज, साहित्य तसेच बसमधील कोचिंग आणि इतर भाग जळून खाक झाले. आग आटोक्यात आणल्यानंतर केवळ सांगाडाच शिल्लक राहिल्याचे दिसून आले.ट्रॅव्हल्स बसने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. शहर पोलिसांनी देखील तत्काळ घटनास्थळी येऊन गर्दी हटवत मदतकार्य केले. अनेकांनी बस पेटल्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या आगीबाबत चालक शेख रिजवान याने अग्निशमन दलाकडे प्राथमिक नोंद केली आहे. आगीमध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशयबसमध्ये चालकाच्या केबिनमधून आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. अग्निशमन दलाने केलेल्या पाहणीत आणि प्राथमिक चौकशीत शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे. तरीही अन्य कारण असू शकते काय? याचा तपास सुरू आहे.
थोडक्यात अनर्थ टळलाचालकाच्या केबिनमधून धूर येऊन आग लागल्यानंतर आतमध्ये सर्वत्र धूर पसरला. चालक आणि प्रवाशांच्या प्रसंगावधानाने आपत्कालीन दरवाजातून त्यांना तत्काळ बाहेर काढले. त्यामुळे अनर्थ टळल्याचे घटनास्थळी पाहणाऱ्यांनी सांगितले.
Web Summary : A travel bus in Sangli caught fire due to a suspected short circuit. Passengers were safely evacuated through the emergency exit before the fire intensified. The fire brigade extinguished the blaze, but the bus was completely destroyed.
Web Summary : सांगली में एक ट्रैवल बस में शॉर्ट सर्किट से आग लग गई। आग लगने से पहले यात्रियों को आपातकालीन द्वार से सुरक्षित निकाला गया। दमकल विभाग ने आग बुझाई, लेकिन बस पूरी तरह से नष्ट हो गई।