शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

लय भारी... व्हिजिटिंग कार्डमधून उगवेल झेंडूचे रोपटे

By अविनाश कोळी | Updated: June 16, 2024 20:04 IST

महापालिका आयुक्तांचा उपक्रम : सोशल मिडियावर व्हायरल, कल्पकतेला दाद

अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : अधिकाऱ्यांचे एखादे सकारात्मक पाऊल समाजासाठी किती दिशादर्शक असू शकते याची प्रचिती सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अनोख्या उपक्रमातून येत आहे. त्यांनी पर्यावरणपूरक कार्ड तयार करुन ते कार्यालयात येणाऱ्या सर्व लोकांकरीता उपलब्ध केले आहे. विशेष म्हणजे काम संपताच हे कार्ड पाण्यात भिजवून मातीत रोवले की त्यातून रोपटे उगवते.

शासकीय तसेच सामाजिक संस्थांच्या स्तरावर वारंवार पर्यावरण रक्षणाच्या चर्चा होत असतात. त्यासाठी वृक्षारोपणासह अनेक उपक्रमही राबविले जातात. मात्र, निमित्त असेल तरच पर्यावरणपूरक कार्यक्रम हाती घेतले जातात. मात्र, एखाद्या गोष्टीतून सतत पर्यावरण रक्षणाचा संदेश व कृती करण्याला प्रोत्साहन देता येऊ शकेल का, असा विचार महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी केला. त्यातून त्यांना व्हिजिटिंग कार्डची संकल्पना सुचली. त्यांनी लागलीच ती कृतीत उतरविली. त्याबाबतची एक पोस्ट त्यांनी केल्यानंतर सोशल मिडियावरुन ती व्हायरल होत लोकांच्या पसंतीस उतरत आहे.जनतेसाठी खास कार्ड

आयुक्त गुप्ता यांनी त्यांचे व्हिजिटिंग कार्ड सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझ्या कार्यालयात येणाऱ्या सर्वांना आता हे कार्ड मिळणार आहे. हे व्हिजिटिंग कार्ड खास आहे.

कार्डचे वैशिष्ट्य काय?

शुभम गुप्ता यांचे हे व्हिजिटिंग कार्ड सीड (बीज) कार्ड आहे. हे व्हिजिटिंग कार्ड पर्यावरणपूरक असून काम झाल्यानंतर हे कार्ड फेकून देण्याऐवजी भिजवून कुंडीत किंवा मातीत रोवले तर त्याचे रोपटे तयार होते. झेंडूच्या बिया यामध्ये आहेत.

सीड पेपर हा टाकाऊ कागदापासून बनवलेला बायोडिग्रेडेबल इको-पेपर आहे. यामध्ये झाडांच्या बिया असतात आणि हा पेपर तयार करण्यासाठी कोणत्याही झाडाची कत्तल केली जात नाही. जेव्हा हा सीड पेपर मातीत टाकला जातो तेव्हा या बियांमधून रोप तयार होते.ट्विट होतेय व्हायरल

शुभम गुप्ता यांचे याबाबतचे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ११ हजारहून अनेक जणांनी हे ट्वीट लाईक केले असून जवळपास सहाशे जणांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Sangliसांगली