विटा : मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या दौऱ्यास दिवाळीनंतर पुन्हा सुरूवात होत असून १७ नोव्हेंबरला ते मायणीमार्गे विटा येथे येणार असून विट्यातील चौंडेश्वरी चौकात त्यांची जाहीर सभा होणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शंकर मोहिते यांनी याबाबत माहिती दिली.मोहिते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिल्यानंतर जरांगे-पाटील तिसऱ्या टप्प्यात पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. या दौऱ्याला १५ नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. जरांगे-पाटील विटा मार्गे सांगलीकडे जाणार आहेत. दरम्यानच विटा येथे १७ नोव्हेंबरला सकाळी ८.३० वाजता चौंडेश्वरी चौकात जाहीर सभा होणार आहे.पत्रकार परिषदेस दहावीर शितोळे, विठ्ठलराव साळुंखे, जयकर साळुंखे, शशिकांत शिंदे, विनोद पाटील, कुलदीप पाटील, रवी जाधव, अजय पाटील, पांडूरंग पवार, सोमनाथ करूलकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मनोज जरांगे यांची सांगलीतील विट्यात जाहीर सभा, मराठा समाज एकवटणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 18:56 IST