Sangli- मांगले खून प्रकरण: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून, पतीस पाच दिवसाची पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 18:37 IST2025-03-28T18:37:08+5:302025-03-28T18:37:32+5:30
मृतदेह लोखंडी पेटीत कोंबून ठेवला होता

Sangli- मांगले खून प्रकरण: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून, पतीस पाच दिवसाची पोलिस कोठडी
मांगले : दारुच्या नशेत पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करून शिराळा पोलीस ठाण्यात हजर झालेला संशयित आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे (मुळगाव कोकरूड, सध्या रा. मांगले) याला न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली. चारित्र्याच्या संशयावरून पत्नी प्राजक्ताचा खून केल्याची कबुली पतीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्यास असणारा मंगेश कांबळे हा मांगले येथे आई व भावाकडे चार दिवसापूर्वी आला होता. काल, गुरुवारी घरातील सर्वजण एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्याचा प्राजक्ता बरोबर जोरदार वाद झाला. या वादातून त्याने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला. व मृतदेह लोखंडी वीजमीटर पेटीत कोंबून ठेवला होता.
सहा वर्षाच्या मुलामुळे घटना उघडकीस
ही घटना त्याचा सहा वर्षाचा मुलगा शिवममुळे त्वरीत उघडकीस आली. त्यानंतर मंगेश शिराळा पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाला होता. पोलिसांनी पंचनामा करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रात्री त्यांच्या कोकरूड या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
आरोपी मंगेश कांबळे यांने चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची कबूली दिल्याची माहिती पोलिसानी दिली. त्याला आज शिराळा प्रथम वर्ग न्यायडाधिकारी यांचेपुढे उभे केले असता १ एप्रिल पर्यंत पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.