Sangli: बँकेला दोन कोटीला गंडा घालणारा जेरबंद, विश्रामबाग पोलिसांची बेलापूर येथे कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:46 IST2025-08-07T17:46:41+5:302025-08-07T17:46:59+5:30

बेदाणा प्रोसेसिंग युनिट व पॅकेजिंग प्रकल्प उभारणीच्या नावाखाली एक कोटींचा गंडा घालून झाला होता पसार

Man who defrauded bank of two crores arrested, Sangli Vishrambag police take action in Belapur | Sangli: बँकेला दोन कोटीला गंडा घालणारा जेरबंद, विश्रामबाग पोलिसांची बेलापूर येथे कारवाई

Sangli: बँकेला दोन कोटीला गंडा घालणारा जेरबंद, विश्रामबाग पोलिसांची बेलापूर येथे कारवाई

सांगली : येथील एचडीएफसी बँकेला बेदाणा प्रोसेसिंग युनिट व पॅकेजिंग प्रकल्प उभारणीच्या नावाखाली एक कोटी ९८ लाख रुपयांना गंडा घालून पसार झालेल्या मुख्य सूत्रधार महेश हणमंत जाधवर (वय ३५, मूळ रा. वालवड, ता. बार्शी) याला नवी मुंबईतील बेलापूर येथे अटक केली. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुख्य संशयित मुकुंद हणमंत जाधवर याच्यासह नात्यातील सातजणांनी डिस्ट्रीक्ट ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी उभारली होती. या कंपनीमार्फत बेदाणा प्रोसिसिंग युनिट व पॅकिंग प्रकल्प उभारण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेतून एक कोटी ९८ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. कर्जाची रक्कम तीन व्हेंडर कंपन्यांच्या नावावर वर्ग करण्यात आली. प्रकल्प तीन महिन्यात पूर्ण करून कागदपत्रे बँकेकडे सादर करण्याचे बंधन होते. बँकेकडे तारण जमिनीवर प्रकल्प उभारलाच नाही.

कंपनीच्या नावावर कर्ज घेऊन बँकेला एक कोटी ९८ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे निदर्शनास आले. एचडीएफसी बँकेचे सहउपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांनी फिर्याद दिली होती. डिसेंबर २०२४ मध्ये गुन्हा दाखल होताच महेश जाधवर याच्यासह संशयित पसार झाले होते. विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या पथकाला जाधवर हा नवी मुंबईतील बेलापूर येथे असल्याची माहिती मिळाली.

पोलिस कर्मचारी इरफान पखाली, विष्णू गावडे, प्रेरणा नाईक यांच्या पथकाने जाधवर याला मंगळवारी ताब्यात घेतले. बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस कोठडी सुनावली. सरकारी वकील अमर रजपूत यांनी युक्तिवाद केला.

दोन गटात जोरदार वादावादी

संशयित जाधवर याच्या चौकशीसाठी स्वाभिमानी स्वराज्य सेनेने आंदोलन केले होते. तेव्हा जाधवर याने संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सदामते यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, जाधवर याला न्यायालयात आणल्यानंतर त्याचे समर्थक आणि प्रशांत सदामते समर्थक समोरासमोर आल्यामुळे वादावादी, शिवीगाळ झाली.

Web Title: Man who defrauded bank of two crores arrested, Sangli Vishrambag police take action in Belapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.