शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
3
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
4
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
5
'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
6
MI vs DC: मुंबईनं सामना जिंकला अन् मालकीण निता अंबानी यांनी प्रेक्षकांचे मन! पाहा फोटो
7
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
8
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
9
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट
10
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 
11
Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
12
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
13
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
14
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
15
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
16
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
17
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
18
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
19
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
20
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..

Sangli Crime: दारूसाठी पैसे न दिल्याने एकाचा खून; गुन्ह्यात मुलाचे नाव आल्याने आईने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:51 IST

दोघे संशयित ताब्यात 

कवठेमहांकाळ : दारू प्यायला पैसे दिले नसल्याच्या कारणावरून कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे डोक्यात दगड घालून एकाचा खून करण्यात आला. अजित उर्फ संजय कृष्णा क्षीरसागर (वय ४०, रा. कुकटोळी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

स्वप्नील तानाजी क्षीरसागर (वय २७), सुशांत शंकर शेजुळ (वय २५, दोघे रा. कुकटोळी) या दोन संशयितांना कवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, खुनाच्या गुन्ह्यात मुलाचे नाव आल्याचा धक्का बसल्याने सुशांत शेजुळ याच्या आईने राहत्या घरी आत्महत्या केली.मृत अजित उर्फ संजय क्षीरसागर यांचे कुकटोळीपासून चार किलोमीटर अंतरावरील बंडगरवाडी येथे घर आहे. अजित हे रविवार १८ मे रोजी सायंकाळी घरातून बाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत ते परत आले नाहीत. घरातील सदस्यांनी त्यांची शोधाशोध केली, मात्र ते मिळाले नाहीत.

सोमवारी दुपारी गावातील हायस्कूलच्या पाठीमागे अजित क्षीरसागर हे जखमी अवस्थेत आढळले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना जखमी अवस्थेत मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान अजित यांचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला.

कवठेमहांकाळ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गावातील नागरिकांकडे चौकशी केली. सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली असता गावातील चुलत भाऊ स्वप्नील व त्याचा मित्र सुशांत हे त्याच्यासोबत असल्याचे दिसून आले. दोघे गावातून फरारी झाल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय आला.

अवघ्या काही तासांतच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. अजित यांची पत्नी सीमा क्षीरसागर यांनी याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेची कवठेमहांकाळ पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र भापकर करीत आहेत.

खुनाचे कारण आले समोरकवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता खुनाचे कारण समोर आले. संशयितांनी मृत अजित यांच्याकडे दारू प्यायला पैसे मागितले होते. तसेच सुशांत याने काही दिवसांपूर्वी अजित यांच्याकडून उसने पैसे घेतले होते. अजित यांनी ते पैसे परत मागितले. यातून त्यांच्यात वाद झाला. स्वप्नीलने अजित यांना लाथाबुक्क्याने मारहाण करीत त्याच्या पायावर दगड मारला, तर सुशांत शेजुळ याने दगड डोक्यात घातला. याबाबतची कबुली संशयितांनी दिली.

संशयिताच्या आईची आत्महत्याखूनप्रकरणी सुशांत शेजुळ याचे नाव आल्यानंतर या घटनेचा जबरदस्त धक्का त्याच्या आईला बसला. मुलाचे कृत्य कळताच त्याची आई विमल शंकर शेजुळ (वय ४३) यांनी राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन मंगळवारी पहाटे आत्महत्या केली. सुशांतचे वडील लहानपणीच मृत झाले होते. सुशांत एकुलता असल्याने तसेच खूनप्रकरणात त्याचे नाव आल्याने त्याच्या आईला धक्का सहन करता आला नाही. या घटनेची कवठेमहांकाळ पोलिसांत नोंद झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस