शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: जतमध्ये मारहाणीतील जखमीचा मृत्यू, संशयित दोघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:14 IST

जत : जत येथील बसस्थानक आवारात एका तरुणाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. ...

जत : जत येथील बसस्थानक आवारात एका तरुणाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. त्याच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तो सोमवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास मयत झाला आहे. चंद्रकांत इराप्पा वाघमारे (वय ३९, रा. उमराणी, ता. जत) असे मयताचे नाव असून शनिवारी सात वाजण्यापूर्वी ही घटना घडली.पोलिसांनी दुपारीच सांगोला तालुक्यातील घेरडी व जत तालुक्यातील अंतराळ येथून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत जत पोलिसात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चंद्रकांत वाघमारे हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. वरील संशयित आरोपी व चंद्रकांत हे तिघे मित्र होते. शुक्रवारी दि. २६ रोजी रात्री १२ नंतर जत बसस्थानकात थांबले असताना तिघांमध्ये अज्ञात कारणातून वाद झाला. यामध्ये संशयित आरोपींनी चंद्रकांत यांना बेदम मारहाण केली. यात चंद्रकांत खाली असणाऱ्या फरशीवर पडले. यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रात्रीच जत ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी मिरजेला रवाना करण्यात आले होते. आज त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.पोलिसांनी तत्काळ मयताचा पंचनामा करून दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. रात्री जत पोलिस ठाण्यात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत जत पोलिस ठाण्यात आई रेणुका इराप्पा वाघमारे (वय ६०, रा. उमराणी, ता. जत ) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास जत पोलिस करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीjat-acजाटPoliceपोलिस