Sangli: नरभक्षक बिबट्या जेरबंद; बिऊर येथील बालकाला केले होते ठार, पुण्यातील वन्यप्राणी पुनर्वसन केंद्रात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:55 IST2026-02-06T13:55:24+5:302026-02-06T13:55:49+5:30
नरभक्षक बिबट्या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात होते

Sangli: नरभक्षक बिबट्या जेरबंद; बिऊर येथील बालकाला केले होते ठार, पुण्यातील वन्यप्राणी पुनर्वसन केंद्रात दाखल
शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथील राजवीर पाटील या सहा वर्षांच्या बालकावर हल्ला करून त्यास ठार करणारा नरभक्षक बिबट्या गुरुवारी (दि. ५) पुणे येथील शासनाच्या वन्यप्राणी उपचार आणि पुनर्वसन केंद्रात दाखल झाला.
वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय, शिंदे, रजनीकांत दरेकर, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड यांचे पथक बिबट्यास स्वतंत्र बंदिस्त वाहनातून पुणे येथे मध्यरात्री दीड वाजता दाखल करून आले.
शिराळा तालुक्यात या नरभक्षक बिबट्या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. बिबट्यास जेरबंद केल्यानंतर चांदोली आणि परिसरात त्यास अधिवासात सोडण्यात आले आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. तो चांदोलीच्या जंगलात सोडला आहे. अशी अफवा पसरली होती.
त्यास वनविभागाने स्पष्टीकरण दिले आहे. मात्र तो पुणे येथे उपचार केंद्रात दाखल आहे, असे वनविभागाकडून सांगण्यात आले. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.