शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत मोठे ‘आॅपरेशन’ करू

By admin | Updated: December 27, 2016 00:59 IST

पतंगराव कदम : जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी तयारी; काँग्रेसला सर्वात चांगले वातावरण

सांगली : महापालिकेत एकहाती सत्ता असूनही स्थायी समितीचे सभापतीपद विरोधी गटाकडे गेले, ही गंभीर आहे. पदाधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्याचे दिसत नाही. त्यामुळे लवकरच महापालिकेत मला मोठे ‘आॅपरेशन’ करावे लागेल, असा इशारा काँग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला. ते म्हणाले की, महापालिकेत आमचे संख्याबळ अधिक आहे. विरोधी पक्षाचे संख्याबळ कमी असताना त्यांना सभापदी मिळाले. महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेत्यांची यामध्ये जबाबदारी मोठी होती. त्यांनी ती व्यवस्थित पार पाडली का, हे पाहावे लागेल. महापालिकेत मोठे बदल करावे लागतील. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याकडूनही सोमवारी कामकाजाचा आढावा घेतला. रस्त्यांसाठी आलेल्या निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे, अशा सूचना त्यांना दिल्या आहेत. रस्त्यांची कामे प्राधान्याने व्हावीत. दर्जा नियंत्रणासाठी चांगली यंत्रणा उभी करायला हवी. आयुक्तांनी या गोष्टी करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे महापालिकेत यापुढे तरी चांगला कारभार अपेक्षित आहे. जिल्हा परिषदेसाठी आम्ही जोरदार तयारी केली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीचे भानुदास पाटील आमच्याकडे आल्यामुळे काँग्रेसची तालुक्यातील ताकद वाढली आहे. तालुकानिहाय आमचे नियोजन सुरू आहे. अन्य पक्षांतील अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेसाठी चांगले वातावरण तयार झाले आहे. नगरपालिका निवडणुकीमुळे कार्यकर्तेही चार्ज झाले आहेत. नागरिकांमध्ये विद्यमान सरकारबद्दल नाराजी आहे. त्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसलाच मिळणार, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कळीतनोटा बंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने दिलेला आर्थिक निर्बंधाचा कालावधी येत्या चार दिवसात संपणार आहे. तरीही ग्रामीण परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. लोकांचे हाल सुरूच आहेत. जिल्हा बँकेवरील निर्बंधामुळे त्यात भरच पडली आहे. उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत असताना, त्यांना पैसे हातात मिळत नाहीत. हे या निर्णयाचे मोठे अपयश आहे. अन्य घटकांपेक्षा शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे ते म्हणाले. समविचारी पक्षांना एकत्र करणारकाँग्रेस जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार आहे. स्थानिक पातळीवर जे समविचारी घटक, पक्ष किंवा आघाड्या आहेत, त्यांनाही आम्ही सोबत घेणार आहोत. त्यासाठीची चाचपणी सुरू आहे. आष्टा आणि इस्लामपूर येथील नगरपालिका निवडणुकीत आम्ही समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन केलेला प्रयोग यशस्वी झाल्याने तसे प्रयत्न जिल्हा परिषदेसाठी काहीठिकाणी होतील. औषध मिळणेही झाले मुश्किलनोटा बंदीच्या निर्णयामुळे अजूनही लोकांच्या अडचणी दूर झालेल्या नाहीत. अनेक लोकांना औषधे खरेदी करणेही मुश्किल झाले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचे हे हाल पाहवत नाहीत. भारती हॉस्पिटलमार्फत आम्ही मोफत औषधांचा उपक्रम त्यासाठी सुरू केला आहे. आणखी किती दिवस अशी परिस्थिती राहील, याचा अंदाज कोणालाच नाही.