शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
4
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
5
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
6
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
7
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
8
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
9
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
10
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
11
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
12
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
13
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
14
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
15
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
16
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
17
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
18
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
19
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
20
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएममध्ये २ हजार मतं वाढली; सांगलीत आष्ट्यातील स्ट्राँगरूमबाहेर मविआ कार्यकर्त्यांचा गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 19:27 IST

Local Body Election: आमदार जयंत पाटील यांची घटनास्थळी भेट

सुरेंद्र शिराळकर

आष्टा : आष्टा नगरपरिषद निवडणुकीत सुमारे दोन हजार मतदान वाढल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच, सहा व दहा या ठिकाणी झालेल्या मतदानाची आकडेवारी वाढल्याचा आक्षेप घेत आष्टा शहर विकास आघाडीसह शिवसेना शिंदे गट काँग्रेस व अपक्षांनी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर मोठी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान आमदार जयंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरूमची पाहणी केली व प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले. 

आष्टा नगर परिषदेसाठी काल, मंगळवारी (दि.२) चुरशीने ७४.७६ टक्के मतदान झाले. थेट नगराध्यक्षपदासह १२ प्रभागातील २४ जागांसाठी एकूण ३० हजार ५७४ मतदारांपैकी २२ हजार ८६४ मतदारांनी मतदान केले. मात्र प्रशासनातील एका व्यक्तीने प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच, सहा व दहा या ठिकाणी झालेल्या मतदानाच्या आकडेवारीत वाढ दाखवली. एकूण ३३ हजार ३२८ मतदार दाखवून २४ हजार ९१३ मतदान झाल्याचे सांगितले.

मतदार अन् मतदान किती दाखवले..

प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रत्यक्षात १३११ मतदारांपैकी ९९६ मतदारांनी मतदान केले. मात्र याठिकाणी ४०७७ मतदार दाखवून ३१०९ मतदान दाखवण्यात आले. प्रभाग क्रमांक चारमध्ये ३२१७ मतदारांपैकी २३७६ मतदान झाले. मात्र या ठिकाणी २४१३ मतदार दाखवून १८१२ दाखवण्यात आले. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पाचमध्ये ३ हजार १५६ मतदारांपैकी २४५९ मतदारांनी मतदान केले. मात्र या ठिकाणी २३६६ मतदार दाखवून १८६२ मतदान झाल्याचे दाखवले. प्रभाग क्रमांक सहामध्ये ३०५६ मतदार असून २३९४ मतदारांनी मतदान केले. याठिकाणी २२९२ मतदारांपैकी १७९५ मतदान दाखवले. तसेच प्रभाग क्रमांक १०मध्ये १९७३ मतदारांपैकी १५५९ मतदारांनी मतदान केले. या ठिकाणी ४३१९ मतदारांपैकी ३२६० मतदारांनी मतदान केल्याचे दाखवले.तीन, पाच प्रभागातील केंद्रावर मतदान यंत्रात बिघाडमतदानावेळी प्रभाग क्रमांक तीनमधील सिद्धार्थनगर येथील मतदान केंद्रावर तसेच प्रभाग क्रमांक ५ मधील मतदान केंद्रावर सुमारे तासभर मतदान यंत्रातील बिघाडामुळे मतदान थांबवले होते. नवीन मतदान यंत्रे मिळाल्यानंतर याठिकाणचे मतदान सुरळीत सुरु झाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : EVM Glitch: Tension in Sangli After Vote Count Discrepancy

Web Summary : A discrepancy in vote counts after the Ashta Nagar Parishad election caused tension. MVA workers protested outside the strongroom, alleging 2000 extra votes. MLA Jayant Patil visited, urging caution. Faulty EVMs were reported in wards three and five, halting polling.