सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:55 IST2025-12-03T15:54:48+5:302025-12-03T15:55:52+5:30
सांगलीतील आष्टा शहरातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला आहे. स्ट्राँगरुमला सुरक्षा नसून मतांची टक्केवारीही वाढवल्याचा आरोप केला आहे.

सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
दुर्वा दळवी
काल राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषदांसाठी मतदान झाले. या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी समोर येणार आहेत. दरम्यान, आता सांगली जिल्ह्यातील आष्टा येथून एक मोठी अपडेट आली आहे. येथील स्ट्राँगरुम बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला आहे. स्ट्राँगरुमचे सीसीटीव्ही बंद होते असा आरोप आहे. तसेच मतांच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैभव शिंदे हे देखील उपस्थित आहेत. त्यांनी मतांच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचा आरोप केला आहे. मतांची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये तफावत असल्याचा आरोप आहे. कार्यकर्त्यांनी आकडेवारीबाबत जुळवून देण्याची मागणी केली आहे अचानक ही आकडेवारी कशी वाढली?, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच स्ट्राँगरुमबाहेरचे सीसीटीव्ही बंद आहेत. आतापर्यंतचे फुटेज दाखवण्याची मागणी केली आहे.
मतदानाच्या टक्केवारीवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आष्ट्यातील स्ट्रॉंग रूम समोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या केला. स्ट्रॉंग रूमच्या समोर कार्यकर्त्यांचा जोरदार गोंधळ सुरू आहे. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी असा कोणताही घोळ झाला नसल्याचा दावा केला आहे.