शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रोहित पाटील यांच्याविरोधात अजितदादांची खेळी? संजयकाकांनी घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:33 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून जागावाटपाबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यात विशेष लक्ष दिल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात घडामोडींना वेग आला आहे. आज भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी अजित पवार यांची पक्षकार्यालयात भेट घेतली आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहित पाटील यांच्याविरोधात संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईमध्ये भेट घेतली. यावेळी पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. संजयकाका पाटील म्हणाले, निवडणुकीबाबत सगळं चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होईल. मी भाजपाच्या नेत्यांशी बोलून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांनाही भेटायला जाणार आहे. अजून तासगाव मतदारसंघ कोणाला जाणार हे ठरलेलं नाही, दोन्ही वरिष्ठ नेते ठरवणार आहे. आज बैठक झाल्यानंतर या मतदारसंघाबाबत उद्या निर्णय देतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे, अशी माहिती संजयकाका पाटील यांनी दिली. 

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून माजी खासदार संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहित पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा आहे. 

प्रभाकर पाटील घड्याळ चिन्हावर विधानसभा लढणार?

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शरद पवार गटाकडून यावेळी रोहित पाटील रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट आहे. तर त्यांच्याविरोधात माजी खासदार संजयकाका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. प्रभाकर पाटील घड्याळ चिन्हावर ही निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. 

मागच्यावेळी आमदार सुमनताई पाटील यांच्याविरोधात अजितराव घोरपडे यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी पक्षफुटीमुळे निवडणुकीतील समि‍करणे बदलली आहेत. यामुळे आता महायुतीमध्ये तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार यावर लढती ठरणार असल्याचे बोलले जात आहे.   

टॅग्स :sanjaykaka patilसंजयकाका पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवार