Maharashtra Politics : "जनतेच्या पैशांवर लग्न करणाऱ्यांवर कोण बोलत नाही..."; कोकाटेंच्या विधानावर सदाभाऊ खोतांनी स्पष्टच सांगितलं
By संतोष कनमुसे | Updated: April 5, 2025 15:22 IST2025-04-05T15:17:13+5:302025-04-05T15:22:37+5:30
Maharashtra Politics : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन मोठे विधान केले.

Maharashtra Politics : "जनतेच्या पैशांवर लग्न करणाऱ्यांवर कोण बोलत नाही..."; कोकाटेंच्या विधानावर सदाभाऊ खोतांनी स्पष्टच सांगितलं
Maharashtra Politics ( Marathi News ) : महायुतीचे सरकार सत्तेत येऊन चार महिने उलटले. पण, प्रचारसभांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अजूनही निर्णय घेतलेला नाही. सध्या कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्या संदर्भात सांगितले होते. दरम्यान, आता काल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जावरुन शेतकऱ्यांना सुनावले. यावरुन आता आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्री कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सांगलीत इस्लामपूर येथे पत्रकारांसोबत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना फटकारले आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, 'राज्याचे कृषीमंत्री आणि ज्या पद्धतीने आज शेतकऱ्याच्या संबंधांमध्ये उद्गगार काढले ते मला वाटतं योग्य आहे असं मला वाटत नाही. परंतु त्यांचा बोलण्याचा हेतू वेगळा असू शकतो कृषीमंत्री झाल्यानंतर त्यांचं काम पाहिलं तर समाधानकारक आहे, असंही खोत म्हणाले.
"या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे का? तर निश्चितपणे दिली पाहिजे. याचं कारण शेतकऱ्याचं कर्ज हे सरकारचं धोरणामुळे झालेला आहे आणि सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते आपल्याला रद्द करावे लागतील. शेतमालाला चांगला भाव मिळेल. या संदर्भामध्ये धोरण आखावी लागतील आणि जोपर्यंत शेतीमध्ये आपण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल असं धोरण आखणार नाही. शेतकरी विरोधी कायदे हठवणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कर्जाचे पीक येणार आहे, असंही आमदार सदाभाऊ खोत म्हणाले.
'जनतेच्या तिजोरीवर दरोडे टाकून लग्न करतात त्यांच्यावर कोण बोलत नाही'
आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, खऱ्या अर्थान बघितलं तर शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांची बार्शी आणि लग्न हे शेतकऱ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. ते सर्वजण साजरे करत असतात. त्यांच्या परिस्थितीनुसार करत असतात. परंतु जनतेच्या तिजोरीवरती दरोडे टाकून राजकारणातले राजकारणी ते पांढऱ्या कपड्यातले लायसनधारक दरोडेखोर हे आपल्या लेकरा बाळांच्या लग्नावरची खर्च करतात. तो खर्च जर बघितला तर एखाद्या अख्या गावचे लग्न होईल तेवढा खर्च हे राजकारनी दरोडेखोर आपल्या लेकरा बाळांचा लग्नामध्ये खर्च करतो, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला.