शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाची फूस, मोबाइलचा लागला मोह; सांगली जिल्ह्यात वर्षभरात १३२ लेकी घरातून दुरावल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 19:37 IST

अल्पवयीन युवती पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ, वास्तवाचे भान आल्यानंतर ८० टक्के घरी परत

सांगली : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि कौटुंबिक विसंवादामुळे तरुण पिढी भरकटत असल्याचे धक्कादायक वास्तव सांगली जिल्ह्यात समोर आले आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून १८ वर्षे पूर्ण झालेल्या १३२ युवतींने घर सोडल्याची नोंद झाली आहे. तसेच, अल्पवयीन मुलींचे प्रमाण देखील जवळपास तितकेच आहे.मुख्यतः सोशल मीडियावरून होणारी ओळख आणि 'प्रेमाची फूस' यामुळे अल्पवयीन मुली घरून पळून जाण्याचे धाडस करत आहेत. पोलिस दलाकडे नोंद असलेल्या आकडेवारीनुसार, १८ वर्षांवरील १३२ युवती बेपत्ता झाल्या आहेत. प्रेमप्रकरणातून घर सोडण्याचे प्रमाण जास्त असून, अनेकदा वास्तवाचे भान आल्यानंतर पश्चात्ताप होऊन यातील काही मुली घरी परततात.मोबाईलचा अतिवापर आणि पालकांशी असलेला संवादाचा अभाव यामुळे मुलांच्या निर्णयक्षमतेवर डिजिटल दुनियेचा नकारात्मक पगडा बसत आहे. मुलांवर सक्ती करण्यापेक्षा पालकांनी त्यांच्याशी मैत्रीचे नाते जपल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.वर्षांत १३२ युवती बेपत्तासांगली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १८ वर्ष पूर्ण झालेल्या एकूण १३२ युवतींनी घर सोडल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. अल्पवयीन मुलींचे प्रमाणही जास्त आहे.

मोबाइलचा अतिरेक, सोशल मीडिया मुख्य कारणतासनतास मोबाईलचा वापर आणि अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावर होणारी मैत्री यामुळे मुली भरकटत असल्याचे दिसून येते.

प्रेमप्रसंगातून २५ टक्के मुले-मुली सोडतात घरएकूण बेपत्ता प्रकरणांपैकी २५ टक्क्यांहून अधिक प्रकरणे ही केवळ प्रेमप्रकरणातून घर सोडून जाण्याची आहेत.

वास्तवाचे भान आल्यानंतर ८० टक्के घरी परतपळून गेल्यानंतर सामाजिक आणि आर्थिक वास्तवाची जाणीव होताच सुमारे ८० टक्के मुले-मुली पुन्हा घरी परत येतात.

मुलांच्या निर्णयक्षमतेवर डिजिटल दुनियाचा पगडाआभासी जगातील आकर्षणा मुळे मुलांची सारासार विचार करण्याची क्षमता कमी होऊन ते चुकीचे धाडसी निर्णय घेत आहेत.

पालकांनी काय काळजी घ्यावी ?

  • मुलांच्या मोबाइल वापराकडे लक्ष द्यावे आणि त्यांच्या वर्तणुकीत होणाऱ्या बदलांचे वेळीच निरीक्षण करून त्यांना विश्वासात घ्यावे.
  • पालकांनो, सक्ती नव्हे मैत्रीने निघेल मार्ग
  • पाल्यांशी कडक वागण्यापेक्षा किंवा सक्ती करण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधल्यास ते आपल्या समस्या मोकळेपणाने मांडू शकतील.
English
हिंदी सारांश
Web Title : Love's lure, mobile addiction: 132 girls eloped in Sangli district.

Web Summary : Sangli district reports 132 young women eloped due to social media influence and family discord. Mobile overuse and online relationships are major factors. Experts advise parental communication over strictness, as most return after realizing reality.