शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत चिमुकल्यांनी गिरवले मोबाईलवर धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST

शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता पहिलीमधील चिमुकल्यांनी मोबाईलद्वारे शिक्षणाचा श्रीगणेशा केला. काळानुरूप बदलत्या शिक्षणासाठी ...

शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता पहिलीमधील चिमुकल्यांनी मोबाईलद्वारे शिक्षणाचा श्रीगणेशा केला. काळानुरूप बदलत्या शिक्षणासाठी नवी पिढी सज्ज असल्याचे या उपक्रमाने सिद्ध झाले आहे.

सलग दुसऱ्या वर्षी शाळेची ऑनलाईन घंटा झाली. पहिलीच्या वर्गातील प्रवेशही ऑनलाईन झाले. अशावेळी पहिल्या इयत्तेतील मुले ऑनलाईन वर्गास कसा प्रतिसाद देतात याबाबत कुतूहल होते. परंतु चिखली शाळेच्या पहिलीतील मुलांनी ऑनलाईन वर्गास नव्वद टक्के उपस्थित राहून मोबाईलवर शिक्षण सुरू केले. यातून बदलत्या शिक्षण पद्धतीस विद्यार्थी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले.

या ऑनलाईन वर्गास केंद्रप्रमुख दऱ्याप्पा साळी यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की ऑनलाईन शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहावे. शिक्षण प्रक्रिया थांबू न देणाऱ्या ऑनलाईन शिक्षणाचे स्वागत करणे गरजेचे आहे.

यासाठी मुख्याध्यापिका स्वाती देसाई, शिक्षक राजेंद्र पाटील, सुभद्रा माने परिश्रम घेत आहेत. याबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.