अंत्री खुर्द येथे रस्त्याकडेला बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST2021-02-05T07:26:03+5:302021-02-05T07:26:03+5:30

शिराळा : अंत्री खुर्द - वाकुर्डे खुर्द रस्त्यावर सायंकाळी पाचच्या दरम्यान बिबट्याने रस्त्यावरच ठाण मांडले होते. परिसरात बिबट्यांचा वावर ...

Leopard sighting on the road at Antri Khurd | अंत्री खुर्द येथे रस्त्याकडेला बिबट्याचे दर्शन

अंत्री खुर्द येथे रस्त्याकडेला बिबट्याचे दर्शन

शिराळा : अंत्री खुर्द - वाकुर्डे खुर्द रस्त्यावर सायंकाळी पाचच्या दरम्यान बिबट्याने रस्त्यावरच ठाण मांडले होते. परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ठाण मांडून बसलेल्या याबिबट्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

अंत्री खुर्द - वाकुर्डे खुर्द रस्त्यावर मोरणानगर वस्ती आहे. या ठिकाणी हा बिबट्या रस्त्यावरच बसला होता. तसेच या रस्त्याच्या बाजूलाच वस्ती आहे. येथील घरांसमाेर अंगणात पंधरा-वीस कोंबड्या फिरत होत्या. त्या टिपण्यासाठी बिबट्या बसला होता. यादरम्यान वाहन आले. यातील नागरिकांनी या बिबट्याचा व्हिडिओ काढला, तसेच त्यास आरडाओरडा करून हुसकावून लावले. याचबरोबर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरातील नागरिकांनाही सावध केले. तालुक्यात सर्वत्र बिबट्यांची संख्या वाढली आहे. ऊस पिकांमुळे त्यामध्ये गावाजवळच्या परिसरात बिबट्यांचे वास्तव्य वाढले आहे. यामुळे नागरिक आणि शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Leopard sighting on the road at Antri Khurd