रामानंदनगर येथे गुरुवारपासून व्याख्यानमाला व कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST2021-02-05T07:27:30+5:302021-02-05T07:27:30+5:30

सावंतपूर : समाजवादी प्रबोधिनी, लोकशाही वाचवा कृतिशील विचार मंच, श्री समर्थ साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळ व ...

Lecture series and poets' convention from Thursday at Ramanandnagar | रामानंदनगर येथे गुरुवारपासून व्याख्यानमाला व कविसंमेलन

रामानंदनगर येथे गुरुवारपासून व्याख्यानमाला व कविसंमेलन

सावंतपूर : समाजवादी प्रबोधिनी, लोकशाही वाचवा कृतिशील विचार मंच, श्री समर्थ साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळ व व्ही. वाय. (आबा) पाटील समाज प्रबोधन ॲकॅडमी यांच्यातर्फे रामानंदनगर (ता. पलूस) येथे दि. २८ जानेवारीपासून व्याख्यानमाला व कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

आचार्य शांताराम गरुड जयंती व गोविंद पानसरे शहीद दिनानिमित्त होणाऱ्या आचार्य शांतारामबापू गरुड व्याख्यानमालेत दि. २८ जानेवारी रोजी ‘नवे शैक्षणिक धोरण-२०२०’ या विषयावर प्रसाद कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. दि. २९ जानेवारी रोजी मारुती शिरतोडे यांचे ‘आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जीवनकार्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि. ३० जानेवारी राेजी ॲड. के. डी. शिंदे यांचे ‘दिल्लीतील शेतकरी आंदोलन व शेतकरी कामगारविरोधी कायदे’ या विषयावर सायंकाळी ५ वाजता व्याख्यान होणार आहे. हे व्याख्यान आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र, डॉ. अमोल पवार, श्री धोंडाराज महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था यांच्या सौजन्याने होत आहे.

दि. ३१ जानेवारी रोजी श्री समर्थ साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळ पलूस यांच्यातर्फे कामगार भवन, रामानंदनगर येथे दुपारी १ वाजता १८ व्या परिवर्तन साहित्य संमेलनांतर्गत बहारदार ‘कवी संमेलन’ आयोजित केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कथाकथनकार विश्वनाथ गायकवाड, विटा हे असून उद्घाटक कथाकथनकार हिम्मत पाटील (नागठाणे) व स्वागताध्यक्ष कवी संदीप नाझरे (आमणापूर) हे आहेत, अशी माहिती संयोजक समितीच्या वतीने व्ही. वाय. (आबा) पाटील, कवी किरण शिंदे, डॉ. अमोल पवार, कवी संदीप नाझरे, प्रा. रवींद्र येवले, संजीव तोडकर, कुमार गायकवाड, जयवंत मोहिते, जितेंद्र कांबळे, माधवी शिंदे, सुनीता कोळी यांनी केले आहे.

Web Title: Lecture series and poets' convention from Thursday at Ramanandnagar