शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
5
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
6
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
7
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
8
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
9
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
10
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
11
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
12
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
13
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
14
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
15
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
16
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
17
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
18
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
19
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...

‘अलमट्टी’प्रश्नी नेत्यांची उदासीनता; जलआयोगाला पाच हजार पत्र पाठवून उंची वाढवण्यास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:59 IST

मुख्यमंत्री पूर येण्याची वाट बघतात की काय?

सांगली : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला २००५, २०१९, २०२१ च्या महापुरानंतरही जिल्ह्यातील खासदार, आमदार अलमट्टी धरणाच्या उंची वाढविण्यावर काहीही बोलत नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारकडे विरोध करत नसल्यामुळे सांगलीकरांना महापुराचा सामना करावा लागणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कोणत्याच हालचाली नाहीत, असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केला. तसेच अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, यासाठी केंद्रीय जलआयोगाला पाच हजार पत्रं पाठविणार आहे, असेही ते म्हणाले.सांगलीत कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. यावेळी सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, प्रमोद माने, प्रदीप वायचळ, सतीश रांजणे, डॉ. अभिषेक दिवाण, संजय कोरे, ओंकार दिवाण, हेमंत बावलेकर, दिनकर पवार, विजयकुमार खटावकर आदी उपस्थित होते.सर्जेराव पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास आंध्र प्रदेश सर्वोच्च न्यायालयात २५ एप्रिल २००० मध्ये आंध्र प्रदेश राज्याने हरकत घेतली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने धरणाच्या दरवाजाची उंची कमी करून ५१९.६० मीटर ठेवण्याचे आदेश दिले. पुढील पर्यावरणाची परवानगी घेऊन तसेच जलशक्ती मंत्रालयाची परवानगी घेऊन उंची वाढवण्याचा निर्णय घ्यावा, असे याचिकेत उत्तर दिले. याकडे दुर्लक्ष करून कर्नाटक पाणी वाटप लवादाच्या निर्णयानुसार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार आणि अधिकारी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. अधिसूचना निघावी म्हणून केंद्र शासनाकडे बैठकीची मागणी केली. कर्नाटक सरकारचा निर्णय पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूरकी आयआयटी महाविद्यालयाकडून अलमट्टी धरणाच्या अभ्यासाचा अहवाल लवकर मिळावा, अशी मागणी केली आहे. त्यासाठी ३८ लाख रुपये सांगली पाटबंधारे यांनी भरले आहेत. तरीही दोन वर्षात अहवाल मिळत नाही. म्हणून कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीतर्फे पाच हजार तक्रारी केंद्रीय जलआयोग, प्रधानमंत्री कार्यालय, पर्यावरण विभाग, जलशक्ती मंत्रालय व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री पूर येण्याची वाट बघतात की काय?पूर येऊ नये, यासाठी आम्ही काम करत आहे. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर येण्याची वाटप बघतात की काय, असा प्रश्न सांगलीकरांना पडला आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात कोणत्याच हालचाली दिसत नाहीत, असा आरोपही सर्जेराव पाटील यांनी केला. तसेच नागरिकच रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र