शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने रब्बीला जीवदान

By admin | Updated: November 21, 2014 00:30 IST

कवठेमहांकाळ तालुका : द्राक्ष, डाळिंब बागांचे मात्र मोठे नुकसान

कुची : कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष, डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका आदी पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात रब्बी पिकांच्या ७८ टक्के पेरण्या झाल्या आहेत.संपूर्ण तालुक्यासह तालुक्यात आलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष, डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच दावण्यासह इतर रोगांचा सामना करताना द्राक्ष, डाळिंब बागायतदार मेटाकुटीस आले होते. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, असी मागणी त्यांच्याकडून होत आहे. दुसरीकडे या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिके जोर धरू लागली आहेत. तालुक्यात ७८ टक्के पेरण्या झाल्या असून, सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रब्बीच्या पेरणी क्षेत्रात आणखी वाढ होणार आहे. अद्याप गहू, मका, हरभरा पिकांच्या पेरणी क्षेत्रात वाढ होऊ शकते. यावर्षी मका पिकाची पेरणी सर्वात जास्त झाली असून, अजून १०० हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तालुक्यामध्ये अवकाळीच्या नैसर्गिक संकटाने एकीकडे प्रचंड नुकसान, तर दुसरीकडे जीवदान असे चित्र दिसत आहे. (वार्ताहर)तालुक्यातील पेरणीची सद्यस्थितीपिके सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्रज्वारी १८७८३ हेक्टर १५0२0 हेक्टरगहू १६00 ९३१मका ८४९ १४४१हरभरा २१५४ १२५६सूर्यफूल १00 00करडई ३५0 २७गळीत धान्ये १३0 ३२