शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

बापूसाहेब मगदूम यांना अखेरचा निरोप सांगलीत अंत्यसंस्कार : अंत्ययात्रेत हजारो हमाल, असंघटित महिलांची उपस्थिती; मान्यवरांकडून आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:57 IST

हमाल पंचायत व हिंद मजदूर सभेचे ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब भुजाप्पा मगदूम (वय ८८) यांना मंगळवारी साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. सोमवारी रात्री अकरा वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने

सांगली : हमाल पंचायत व हिंद मजदूर सभेचे ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब भुजाप्पा मगदूम (वय ८८) यांना मंगळवारी साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. सोमवारी रात्री अकरा वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने हमाल, कष्टकऱ्यांसह पुरोगामी चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने खणभाग येथे त्यांच्या हिंद मजदूर संघाचे कार्यालय असणारी ‘कष्टकºयांची दौलत’ ही इमारत पोरकी झाली असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.मगदूम यांची समाजवादी, पुरोगामी, कष्टकरी, कामगारांचे नेते म्हणून राज्यात ओळख होती. ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांचे सहकारी म्हणून ते ओळखले जात. आढाव यांच्यासोबत त्यांनी हमालांच्या हक्कासाठी व प्रश्नांवर अनेक आंदोलने करुन त्यांना सन्मान मिळवून दिला. हळदीच्या गिरणीत काम करणाºया महिलांना न्याय मिळवून देण्यासाठीही लढा उभारला होता. हमाल पंचायतीचे सरचिटणीस म्हणून ते अनेक वर्षे कार्यरत होते. राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष विकास मगदूम यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा विकास यांच्यासह पत्नी चंपावती, मुली सुनीता व अनिता, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.मंगळवारी सकाळी वसंतनगर येथील त्यांच्या घरापासून अंत्ययात्रा सुरू झाली. मार्केट यार्ड येथील हमाल भवनमध्ये त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. तेथे महापौर संगीता खोत, माजी केद्रींय राज्यमंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, चेंबर आॅफ कॉमर्सचे संचालक, हमाल-मापाडी यांनी अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर पंचमुखी मारुती रोडवरील ‘कष्टकºयांची दौलत’मध्ये पार्थिव आणण्यात आले. ज्या ठिकाणी बसून बापूसाहेबांनी हमालांसह कष्टकरी, असंघटित कामगारांचे प्रश्न सोडविले, त्या इमारतीने त्यांना अखेरचा निरोप दिला. पंचमुखी मारुती रोडवरून अंत्ययात्रा येथील कृष्णा घाटावरील स्मशानभूमीत पोहोचली. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष बाबा आढाव, काँग्रेसचे नेते विशाल पाटील, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी महापौर सुरेश पाटील, बापूसाहेब पाटील, गौतमीपुत्र कांबळे, बाळासाहेब कलशेट्टी, अ‍ॅड्. के. डी. शिंदे, डॉ. बाबूराव गुरव, डॉ. धनाजी गुरव, दिलीप सूर्यवंशी, बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील, संपतराव पवार, नामदेव करगणे, गोपाळ मर्दा, शरद शहा, सदाशिव मगदूम, शैलेश पवार, वि. द. बर्वे, नितीन चव्हाण, मुजीर जांभळीकर, अरुण खरमाटे, बाळासाहेब बंडगर, नगरसेवक मनगू सरगर, मनोज सरगर, प्रशांत पाटील, सुरेश दुधगावकर, शालन मोकाशी, विद्या स्वामी, ज्योती अदाटे, महेश खराडे, डॉ. संजय पाटील, राहुल थोरात, प्रा. रवींद्र ढाले, प्रा. अमर पांडे, किरणराज कांबळे आदींसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार, हमाल उपस्थित होते. मगदूम यांचे अखेरचे दर्शन घेताना हमाल आणि कष्टकºयांना अश्रू अनावर झाले होते.सांगलीत मंगळवारी बापूसाहेब मगदूम यांच्या अंत्यसंस्कारावेळी श्रद्धांजली वाहताना बाबा आढाव, शेजारी डॉ. बाबूराव गुरव, शंकर पुजारी, शाहिन शेख उपस्थित होते.