शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सांगलीत पुरेशा रेमडेसिविरअभावी हाहाकार उडण्याची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 6:34 PM

CoronaVirus Sangli : सांगली जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनच्या उपलब्धतेविषयी आणीबाणीची स्थिती आहे. उपलब्ध साठा दोन-तीन दिवसांपुरताच आहे. जिल्ह्याला दोघे मंत्री असतानाही अशी अवस्था निर्माण होणे ही लाजिरवाणी स्थिती असल्याची टिका केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केली.

ठळक मुद्देसांगलीत पुरेशा रेमडेसिविरअभावी हाहाकार उडण्याची भितीजिल्ह्याला दोघे मंत्री असतानाही अशी अवस्था होणे ही लाजिरवाणी स्थिती

सांगली : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनच्या उपलब्धतेविषयी आणीबाणीची स्थिती आहे. उपलब्ध साठा दोन-तीन दिवसांपुरताच आहे. जिल्ह्याला दोघे मंत्री असतानाही अशी अवस्था निर्माण होणे ही लाजिरवाणी स्थिती असल्याची टिका केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केली.महाराष्ट्र राज्य अ‍ौषध परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विशाल दुर्गाडे, सचिव अविनाश पोरे आदींनी पत्रकार बैठकीत सांगितले की, रेमडेसिविरची इंजेक्शन्स पुरेशा प्रमाणात मिळाली नाहीत तर जिल्ह्यात हाहाकार उडेल. दररोजची गरज १००० इंजेक्शन्सची आहे, पुरवठा मात्र अवघा २०० इतकाच आहे. राज्याच्या साठ्यामध्ये सांगलीचा कोटा फक्त एक टक्का आहे. काळाबाजार केल्यास कारवाईचा इशारा देणार्या मंत्र्यांनी इंजेक्शन्स उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. कागदोपत्रीच उपलब्धता दाखविली जात आहे. लोक पैसे घेऊन तयार आहेत, पण इंजेक्शन्स मिळत नाहीत.ते म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या आणखी वाढणार आहे, त्यावेळी इंजेक्शनअभावी गंभीर स्थिती निर्माण होईल. रेमडेसिविरचे सुमारे तेरा मुख्य वितरक आहेत, त्यांच्याकडे पुरेसा साठा नाही. इंजेक्शनच्या किंमती ९०० रुपयांपासून साडेपाच हजार रुपयांपर्यंत आहेत. ही तफावतदेखील शासनाने दूर केलेली नाही. त्यावरील जीएसटी रद्द करण्याची गरज आहे, अन्यथा गरीब रुग्ण इंजेक्शनअभावी मृत्यूमुखी पडतील.यावेळी संदीप पाटील, विनायक शेटे, महावीर खोत, प्रकाश सूर्यवंशी, ललीत शहा, नाना असले, श्रीकांत गायकवाड, सचिन बुगड, राजाराम पाटील आदी उपस्थित होते.जयंत पाटील यांचा दावा चुकीचासंघटनेने सांगितले की, जिल्ह्यात पुरेशा इंजेक्शन्सचा पालकमंत्र्यांचा दावा चुकीचा आहे. अवघ्या दोन दिवसांपुरता साठा शिल्लक आहे. दररोज ३०० ते ४०० रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे किमान १००० इंजेक्शन्स पाहिजेत. पण तेरापैकी एकाही वितरकाकडे पुरेसा साठा नाही. सांगलीचा कोटा वाढविण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करायला हवेत.डॉक्टरांनी स्कोअरनुसार इंजेक्शन द्यावेसंघटनेने आवाहन केले की, रेमडेसिविरचा वापर करताना डॉक्टरांनी रुग्णाचा एचआरसीटी स्कोअर व प्रोटोकॉलचे पालन करावे. सरसकट इंजेक्शन देऊ नये. इंजेक्शनच्या निकडीचा विचार करावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली