शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडला अंत्यविधी साहित्यात गोलमाल

By admin | Updated: September 1, 2015 22:32 IST

चौकशीचे आदेश : शिवसेनेचे महापालिकेच्या सहायक आयुक्तांना निवेदन

कुपवाड : येथील स्मशानभूमीतील अंत्यविधी साहित्य पुरवठ्यामध्ये गोलमाल झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे. माहिती अधिकारात ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची महापौर विवेक कांबळे यांनीही चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने दिलेल्या ठेक्यानुसार हिंदूंसाठी तीनशे किलो लाकूड, चार मीटर कापड, तीन लिटर रॉकेलसह काठ्या, मडकी आदी साहित्य ठेकेदाराने पुरवायचे आहे. लिंगायत समाजासाठी मोठा खड्डा खोदून देणे, कापड, वीस किलो मीठ व अन्य पूजेचे साहित्य पुरविणे आवश्यक आहे. ख्रिश्चन समाजासाठी एक खड्डा खोदून देणे व हार-फुले देणे आवश्यक आहे. मुस्लिम समाजासाठी बारा मीटर कापड, तीन फरशा, खड्डा खोदून देणे, विधीचे साहित्य देणे बंधनकारक आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख अमोल पाटील यांनी माहिती अधिकाराखाली एकत्रित केलेल्या माहितीनुसार प्रभाग तीनमध्ये २०१० ते २०१५ या कालावधीमध्ये ५७० लोकांना अंत्यविधीचे साहित्य ठेकेदाराकडून पुरविण्यात आले आहे. हिंदूंना लाकडाव्यतिरिक्त अन्य वस्तू दिल्या जात नाहीत. परंतू, त्याची बिले महापालिकेकडून ठेकेदाराला दिली जातात. ठेक्यात नमूद असलेले साहित्य पुरविले जात नाही. हे साहित्य नातेवाईकांना स्वखर्चाने खरेदी करावे लागते.अत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांनीही याबाबत माहिती नसते. त्यामुळे ते दिलेले साहित्यतच घेऊन जातात. हिंदुना लाकडा व्यतिरिक्त काहीही दिले जात नाही. इतर सामाजाच्याही अत्यविधीसाठी दिल्या जाणाऱ्या साहित्यात कपात केली जाते. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर शिवसेनेने माहिती अधिकाराखाली याबाबत अर्ज केला होता. यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यानंतर याबाबत तक्रारी करण्यात आल्या. याबाबत तक्रार आल्यानंतर महापौर विवेक कांबळे यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी संबंधित ठेकेदार दोषी आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सोमवारी सहायक आयुक्तांना शिवसेनेने कारवाईचे निवेदन दिले. यावेळी शहरप्रमुख अमोल पाटील, उपशहरप्रमुख सूरज कासलीकर, तानाजी जाधव, विजय गडदे, अभिजित राणे, केतन यादव यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)काळ्या यादीत टाकण्याचा इशारा