‘कृष्णा’ची साखर इंडोनेशियाला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST2021-02-05T07:26:42+5:302021-02-05T07:26:42+5:30

शिरटे : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेली साखर नुकतीच इंडोनेशियाला रवाना करण्यात आली. अध्यक्ष डॉ. सुरेश ...

Krishna's sugar sent to Indonesia | ‘कृष्णा’ची साखर इंडोनेशियाला रवाना

‘कृष्णा’ची साखर इंडोनेशियाला रवाना

शिरटे : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेली साखर नुकतीच इंडोनेशियाला रवाना करण्यात आली. अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी २०२०-२१ या गळीत हंगामात कच्ची साखर उत्पादित करण्याचा निर्णय घेतला आहे. या हंगामात पाच लाख क्विंटल कच्ची साखर तयार करून ती निर्यात करण्याचेही उद्दिष्ट ठरविले आहे. त्यानुसार पहिला ट्रक निर्यातीसाठी नुकताच पाठविण्यात आला. या ट्रकचे पूजन अध्यक्ष डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, संजय पाटील, गिरीश पाटील, सुजीत मोरे, अमोल गुरव, ब्रिजराज मोहिते, जनरल मॅनेजर पी.डी. राक्षे उपस्थित होते.

फोटो

: रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे कृष्णा कारखान्याने उत्पादित केलेल्या साखरेचा ट्रक निर्यातीसाठी रवाना करताना डॉ. सुरेश भोसले, जगदीश जगताप व संचालक मंडळ.

Web Title: Krishna's sugar sent to Indonesia